Red Sea: हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात जहाजावर क्षेपणास्त्रे डागली, तेलाच्या टँकरचे नुकसान

हौथी सैन्याचे प्रवक्ते याह्या सारी यांनी ब्रिटीश तेल टँकर अँड्रोमेटा स्टारवरील क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

112
Red Sea: हौथींनी लाल समुद्रात केला पुन्हा हल्ला, तेलाच्या टँकरचे नुकसान; अमेरिकेचे ड्रोन पाडले

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अद्याप संपलेले नाही. दरम्यान, हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात तेलाच्या टँकरचे नुकसान केल्याचा आणि अमेरिकेचे ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. विविध आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. (Red Sea) जेरुसलेम येथे येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातून जाणाऱ्या जहाजावर क्षेपणास्त्रे डागली. एका खासगी सुरक्षा संस्थेने ही माहिती दिली.

हुथी सैन्याचे प्रवक्ते याह्या सारी यांनी ब्रिटीश तेल टँकर अँड्रोमेटा स्टारवरील क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) दिलेल्या माहितीनुसार, जहाजाचे किरकोळ नुकसान झाले आहे, परंतु त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला आहे.

(हेही वाचा – PM Modi in Pune: पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, वाचा सविस्तर)

अमेरिकेचे ड्रोन पाडल्याचा हुथींचा दावा
सारी यांनी अमेरिकन लष्कराचे एमक्यू-9 रीपर ड्रोन पाडल्याचीही घोषणा केली. ते म्हणाले की, ते येमेनच्या हुथी बंडखोरांनी हवाई हद्दीतून पाडण्यात आले. अमेरिकेच्या लष्कराने अद्याप या घटनेवर भाष्य केलेले नाही, मात्र सी. बी. एस. न्यूजने येमेनमध्ये ड्रोन पाडल्याची माहिती दिली आहे. गाझामध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून तिसऱ्यांदा अमेरिकेचे ड्रोन पाडल्याचा दावा हुथींनी केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये अशाच घटना घडल्या होत्या.

इस्रायलच्या इलियट बंदरावरील वाहतूकही विस्कळीत
हुथी हल्ल्यांमुळे केवळ जागतिक व्यापारच नाही तर इस्रायलच्या इलियट बंदरावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पॅलेस्टिनींबरोबर एकजुटीने, हुथी इस्रायल आणि त्याच्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांना लक्ष्य करत आले आहेत. त्यांनी सुरुवातीला बाब-अल-मंडेझ सामुद्रधुनीतील इस्रायली जहाजांना लक्ष्य केले होते.

हुथी बंडखोरांचे पुन्हा तीव्र हल्ले सुरू…
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर हुथी बंडखोरांनी पुन्हा आपले हल्ले तीव्र केले आहेत. गाझा पट्टीत इस्रायल-हमास युद्धादरम्यान, हुथी बंडखोरांनी त्या भागातील नौवहन मार्गांवर हल्ले केले. खासगी सुरक्षा कंपनी एंब्रेने सांगितले की, या हल्ल्यात ३ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. जी पनामाच्या ध्वज असलेल्या टँकरजवळ पडली. हा टँकर सेशेल्समध्ये नोंदणीकृत आहे. ‘प्रिमोर्स्क’ हे जहाज रशियाहून भारतातील गुजरातमधील वाडीनारला जात होते. ‘अँड्रोमेडा स्टार’ नावाचे टँकर जहाज मोचा जवळील जलमार्गातून जात असताना ही घटना घडली. ब्रिटीश लष्कराच्या ‘युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स सेंटर’ने देखील मोचाजवळ हल्ल्या झाल्याची माहिती दिली. या हल्ल्यामुळे लाल समुद्र आणि एडनच्या आखातातून येणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. बुधवारपासून हुथी बंडखोरांकडून २ हल्ले झाले आहेत. अमेरिकेचा ध्वज असलेले एम. व्ही. यॉर्कटाउन या जहाजावर पहिला हल्ला, तर दुसरा हल्ल्यावेळी क्षेपणास्त्र एम. एस. सी. डार्विनवर आदळले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.