IPL 2024, Virat Kohli : क्रिकेटपासून दूर असताना विराटने क्रिकेटसाठी ‘हे’ केलं

IPL 2024, Virat Kohli : अलीकडे आपल्या मुलाच्या जन्मासाठी विराट ३ महिने क्रिकेटपासून दूर होता 

79
IPL 2024, Virat Kohli : क्रिकेटपासून दूर असताना विराटने क्रिकेटसाठी ‘हे’ केलं
IPL 2024, Virat Kohli : क्रिकेटपासून दूर असताना विराटने क्रिकेटसाठी ‘हे’ केलं
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (IPL 2024, Virat Kohli) क्रिकेटपासून दूर घालवलेल्या वेळेत त्याला आलेले अनुभव अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले आहेत. आवडत्या गोष्टीपासून दूर राहिल्यामुळेच कधी कधी तुम्ही त्या बाबतीत किती भाग्यवान आहात ते समजतं. तुम्हाला एखाद्या समस्येचं निकाकरण करणंही सोपं जातं, असं विराटचं म्हणणं आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात विराट अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्धच्या टी-२० (T-20) मालिकेत शेवटचं खेळला. त्यानंतर इंग्लंड (England) विरुद्धची कसोटी मालिका तो खेळला नव्हता.  (IPL 2024, Virat Kohli)

(हेही वाचा- Narayan Rane: उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, नारायण राणेंचा ठाकरेंवर प्रहार)

सुरुवातीला विराटच्या (IPL 2024, Virat Kohli) या निर्णयाचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण, त्यानंतर तो आपली पत्नी अनुष्का शर्माच्या दुसऱ्या बाळंतपणात तिच्याबरोबर राहण्यासाठी सुटीवर गेला होता, ही गोष्ट उघड झाली. यावर कोहलीचं म्हणणं असं की, क्रिकेटमध्ये सगळ्यांनाच खराब फॉर्मशी झगडावं लागतं. जेव्हा जेव्हा तो फॉर्मशी झगडलाय, क्रिकेटपासून दूर राहण्यानेच त्याला मदत मिळाली आहे. (IPL 2024, Virat Kohli)

‘क्रिकेटच्या वर्तुळाकार मैदानात राहून, माझ्या बाजूने गोष्टी का घडत नाहीएत, याचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तुळाबाहेर राहून मला अनेकदा फायदा झाला आहे. मला याची जाणीव झालीय की, माझी बलस्थानं काय आहेत. मी खेळापासून दूर असताना मला पुन्हा एकदा शोधण्याचा प्रयत्न करतो,’ असं विराट म्हणतो.  (IPL 2024, Virat Kohli)

(हेही वाचा- CM Eknath Shinde: “लखनऊमध्ये कोणाची तरी २०० एकर जमीन”, मुख्यमंत्री शिंदेंचा नेमका रोख कुणाकडे?)

आताही क्रिकेटपासून दूर कुटुंबीयांबरोबर त्याने घालवलेला वेळ त्याला नक्कीच फायद्याचा ठरलाय. आयपीएलमध्ये त्याने पुनरागमन केलंय आणि ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर आहे. ‘पुढे काय वाढून ठेवलंय. काय घडणार आहे, हे आपल्या हातात नसतं. पण, प्रयत्न करत राहणं आणि मेहनत घेणं यावर मी कायम विश्वास ठेवला आहे. त्यामुळे तेच मी करतो. बाकी व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यातही मला जे मिळालंय त्यावर कधी कधी विश्वासही बसत नाही,’ असं विराटने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहं. (IPL 2024, Virat Kohli)

हेही पहा-  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.