Veer Savarkar : कोठडीत बंद करून तुम्ही सूर्याचे तेज अडवू शकत नाही – शरद पोंक्षे

Veer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक मुंबई' यांच्या वतीने ६ जानेवारी रोजी पुण्यातील येरवडा कारागृह ते फर्ग्युसन महाविद्यालय अशी स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा काढण्यात आली. या यात्रेला मान्यवरांनी संबोधित केले.

144
Veer Savarkar : कोठडीत बंद करून सूर्याचे तेज तुम्ही अडवू शकत नाही - शरद पोंक्षे
Veer Savarkar : कोठडीत बंद करून सूर्याचे तेज तुम्ही अडवू शकत नाही - शरद पोंक्षे

आज बरोबर शंभर वर्षांपूर्वी सावरकरांची कारागृहातून सुटका झाली असली, तरी त्यानंतर ब्रिटीश सरकारने त्यांना तब्बल १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले. (Veer Savarkar) सावरकरांच्या कर्तृत्वाला बांध घालणे त्यांना शक्य झाले नाही. कोठडीत बंद करून सूर्याचे तेज कोणी अडवू शकत नाही, असे तेजस्वी उद्गार अभिनेते शरद पोंक्षे यांनी काढले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक मुंबई’ यांच्या वतीने ६ जानेवारी रोजी पुण्यातील येरवडा कारागृह ते फर्ग्युसन महाविद्यालय अशी स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा (Swatantryaveer Savarkar Mukti Shatabdi Yatra) काढण्यात आली. या यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात निघाली यात्रा; शेकडो राष्ट्रभक्तांचा सहभाग)

या वेळी अभिनेते रणदीप हुडा (Randeep Hooda), अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe), स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रांतिकारी विचार अमलात आणणे, ही काळाची गरज

अभिनेते शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, कारागृहातून सुटका झाल्यानंतर सावरकरांनी रत्नागिरीच्या १३ वर्षांच्या स्थानबद्धतेत अस्पृश्यता आणि जातीभेद निर्मूलन आणि शुद्धीकरणाची प्रचंड मोहीम चालवली. याच काळात त्यांनी हिंदु समाजाने वाईट रुढी मोडून विज्ञाननिष्ठ बनावे, यासाठी मोठे कार्य केले. ज्या समाजासाठी त्यांनी हे कार्य केले, त्याच समाजाने त्यांचे ऐकले नाही आणि म्हणूनच आज आपल्या देशाची परिस्थिती वाईट आहे. सावरकरांचे क्रांतिकारी सामाजिक विचार अमलात आणणे, ही आजच्या काळाची गरज आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वा. सावरकर यांच्या समाजक्रांतीकारी कार्याला उजाळा देणारी स्वा. सावरकर कारावास मुक्ती शताब्दी )

अशी झाली यात्रा

६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) यात्रेला सुरुवात करण्यात आली. कारागृह अधीक्षकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्याकडे सोपवली. तिथून पुढे अभिनेते रणदीप हुडा (Randeep Hooda) ती प्रतिमा घेऊन कारागृहातून बाहेर आले. यानंतर शंखनादाने आणि ढोल-ताशांच्या गजरात घोषणा देत यात्रा मार्गस्थ झाली. फर्ग्युसन महाविद्यालयात या यात्रेची सांगता झाली. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.