Maulana Masood Azhar Death : दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा मृत्यू ? चर्चेला उधाण

भारताचा शत्रू आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर सोमवारी (१ जानेवारी) झालेल्या बॉम्बस्फोटात ठार झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत.

308
Maulana Masood Azhar Death : दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा मृत्यू ? चर्चेला उधाण

काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर (Maulana Masood Azhar Death) सोमवारी (१ जानेवारी) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास बहावलपूर मशिदीतून परतत असताना ‘अज्ञात व्यक्तींनी’ केलेल्या बॉम्बस्फोटात ठार झाला. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख –

मसूद अजहर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी (Maulana Masood Azhar Death) संघटनेचा प्रमुख आहे. पाकिस्तानातील अपुष्ट बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, कंदाहार अपहरणकर्ता मौलाना मसूद अझहर, दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख, हा भावलपूर मशिदीतून परतत असताना पहाटे ५ वाजता ‘अज्ञात व्यक्तींनी’ केलेल्या बॉम्बस्फोटात मारला गेला आहे.

(हेही वाचा – Manipur Violence : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये हिंसाचार कायम; तीन जणांचा मृत्यू)

संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड –

अजहरचा (Maulana Masood Azhar Death) जन्म १० जुलै १९६८ रोजी पाकिस्तानातील पंजाबमधील बहावलपूर येथे झाला. विशेष म्हणजे, इंडियन एअरलाइन्स फ्लाइट ८१४ (आय. सी. 814) च्या अपहरणानंतर सुटका करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी मसूद अजहर हा एक होता. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अझहर होता. तो इस्लामाबादमधील पाकिस्तानी डीप स्टेटच्या संरक्षक कोठडीत राहत होता, असे अहवालातून समोर आले. ५५ वर्षीय अजहरच्या मृत्यूच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

(हेही वाचा – Goldy Brar : सिद्धू मूसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार केंद्राकडून दहशतवादी म्हणून घोषित)

दाऊदच्या मरणाच्या चर्चा –

मसूद अजहर (Maulana Masood Azhar Death) प्रमाणेच काही दिवसांपूर्वी कुख्यात डॉन आणि १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाचा प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मृत्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. दाऊदवर विषप्रयोग झाला असून, तो रुग्णालयात असल्याची माहिती पाकिस्तानातील काही सोशल मीडिया हँडलद्वारे प्रसारित झाली. त्यानंतर, उलटसुलट चर्चांना उधाण आले. त्याच्यावर विषप्रयोग झाला, त्याचा मृत्यू झाला, अशाही चर्चा होत्या. ६७ वर्षीय दाऊद कराचीमधील एका रुग्णालयात भरती असून, रुग्णालयाच्या त्या मजल्यावर तो एकटाच आहे. वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि जवळचे नातेवाईक यांनाच तिथे प्रवेश असल्याचीही चर्चा दिवसभर रंगली होती. मात्र, या वृत्ताला पाकिस्तान किंवा भारत सरकारने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. (Maulana Masood Azhar Death)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.