Terrorists Killed In Pakistan : भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची पाकिस्तानात काय आहे स्थिती; पाकिस्तानने नाकारली जबाबदारी

दहशतवाद्यांच्या हत्येची मालिका 2021 मध्ये मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या घरावरील हल्ल्यापासून सुरू झाली. तेव्हापासून दहशतवाद्यांच्या सर्व हत्यांमध्ये एकच प्रकार दिसून येतो.

16
Terrorists Killed In Pakistan : भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची पाकिस्तानात काय आहे स्थिती; पाकिस्तानने नाकारली जबाबदारी
Terrorists Killed In Pakistan : भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची पाकिस्तानात काय आहे स्थिती; पाकिस्तानने नाकारली जबाबदारी

भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश असलेल्या 7 दहशतवाद्यांचा गेल्या 3 महिन्यांत पाकिस्तानमध्ये खात्मा झाला आहे. मारले गेलेले सर्व दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (LET), हिजबुल मुजाहिदीन (Hizbul Mujahideen), जैश-ए-मोहम्मद (JM) आणि खलिस्तान चळवळीशी संबंधित होते. (Terrorists Killed In Pakistan)

या दहशतवाद्यांच्या हत्येची मालिका 2021 मध्ये मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या घरावरील हल्ल्यापासून सुरू झाली. तेव्हापासून दहशतवाद्यांच्या सर्व हत्यांमध्ये हाच प्रकार दिसून येतो. प्रत्येक हत्येमध्ये दुचाकीस्वार मुले येतात आणि भारतात दहशत पसरवणाऱ्या आरोपींना मारून पळून जातात. या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेले पाकिस्तानी अधिकारी उघडपणे भारताचे नाव घेत नाहीत. (Terrorists Killed In Pakistan)

(हेही वाचा – Uttarkashi Tunnel Rescue : नितीन गडकरी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना केले आश्वस्त)

पाकिस्तानच्या गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांची नावे आणि त्यांच्या ठिकाणांची माहिती पाकिस्तानला देत आहे. पाकिस्तानने तर त्यावर कोणतीच कारवाई केली नाही. आता त्यापैकी बहुतेक मारले गेले आहेत. मौलाना मसूद अझहरचा जवळचा मौलाना रहीम उल्लाह तारिक याची 13 नोव्हेंबर रोजी कराचीमध्ये अज्ञात लोकांनी हत्या केली होती. पाकिस्तानमध्ये ही हत्या स्थानिक मौलवीची हत्या म्हणून दाखवण्यात आली होती.

या दहशतवाद्यांच्या हत्येची जबाबदारी पाकिस्तानने स्वीकारलेली नाही. यामागे फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) चा दबाव आहे. ज्यांची हत्या झालेली आहे, त्यांना पाकिस्तान दहशतवादी मनात नाही. (Terrorists Killed In Pakistan)

(हेही वाचा – NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची ? सोमवारपासून नियमित सुनावणी)

एका वृत्तानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे 3 मोठे दहशतवादी मारले गेले आहेत. त्यापैकी एक मौलाना मसूद अजहरचा जवळचा असून लष्कर-ए-तैयबामध्ये भरतीसाठी काम करणाऱ्या एका दहशतवाद्याचाही समावेश आहे.

या हत्यांमागे विरोधी देशाची गुप्तचर यंत्रणा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या देशाने स्थानिक मारेकऱ्यांचे जाळे तयार केले आहे. ते आखाती देशांत बसलेल्या कार्यकर्त्यांमार्फत चालवतात. (Terrorists Killed In Pakistan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.