LCA MARK 2 : लढाऊ विमाननिर्मितीत भारताचे मोठे पाऊल; अमेरिकेसोबत करणार ‘ही’ निर्मिती

DRDO GE-414 इंजिन असलेले विमान विकसित करणार आहे. GE-414 ही GE-404 ची प्रगत आवृत्ती आहे. GE-404 इंजिन सध्याच्या LCA आणि 83 LCA MARK 1A मध्ये बसवलेले आहे.

99
LCA MARK 2 : लढाऊ विमाननिर्मितीत भारताचे मोठे पाऊल; अमेरिकेसोबत करणार 'ही' निर्मिती
LCA MARK 2 : लढाऊ विमाननिर्मितीत भारताचे मोठे पाऊल; अमेरिकेसोबत करणार 'ही' निर्मिती

LCA MARK 2 (तेजस MK 2) या हलक्या लढाऊ विमानाचे इंजिन आणि स्वदेशी प्रगत मध्यम लढाऊ विमानाचे पहिले दोन स्क्वाड्रन आता देशात तयार केले जातील. अमेरिकन कंपनी GE एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) संयुक्तपणे ही इंजिने तयार करणार आहेत. त्याच्या सर्व मंजुरी अमेरिकेकडून मिळाल्या आहेत, अशी घोषणा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) प्रमुख डॉ. समीर व्ही कामत यांनी केली. भारतातील संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

(हेही वाचा – ICC Cricket World Cup : या विश्वचषकात भारत प्रथमच ऑलआऊट)

2027 पर्यंत काम पूर्ण

कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने यावर्षी 30 ऑगस्ट रोजी LCA MARK 2 लढाऊ विमानाच्या निर्मितीला मंजुरी दिली होती. हे विमान टप्प्याटप्प्याने मिराज 2000, जग्वार आणि मिग-29 लढाऊ विमानांची जागा घेईल. एलसीए मार्क 2 2027 पर्यंत बांधले जाईल, असे डॉ. समीर व्ही कामत यांनी सांगितले.

DRDO GE-414 इंजिन असलेले विमान विकसित करणार आहे. GE-414 ही GE-404 ची प्रगत आवृत्ती आहे. GE-404 इंजिन सध्याच्या LCA आणि 83 LCA MARK 1A मध्ये बसवलेले आहे. 83 LCA MARC 1As पुढील काही वर्षांत भारतीय हवाई दलात समाविष्ट केले जातील.

(हेही वाचा – Ashokbhau Savarkar : हिंदू महासभा आणि हिंदू राष्ट्र दलाचे कृतीशील कार्यकर्ते स्व. अशोकभाऊ नारायणराव सावरकर)

सरकारने प्रगत मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) विकसित करण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. भारताकडे सध्या 31 तेजस MARC 1A विमाने आहेत, काही काश्मीरमध्ये तैनात आहेत.

एलसीए मार्क 2 फायटर प्लेन प्रकल्पाला मंजुरी 

काश्मीर हे शेजारी देश चीन आणि पाकिस्तानसाठी संवेदनशील आहे. तेजस MK-1 हे मल्टीरोल लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे, जे काश्मीरमधील जंगल आणि डोंगराळ भागात हवाई दलाला अधिक बळकट करेल. भारतीय हवाई दलाकडे सध्या 31 तेजस लढाऊ विमाने आहेत.

(हेही वाचा – Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून; ५ राज्यांतील निवडणुकांचा होणार परिणाम)

एलसीए मार्क 2 फायटर प्लेन प्रकल्पाला सरकारची मंजुरी मिळाली आहे. यासाठी डिझायनर्सना 17.5 टन क्षमतेचे सिंगल इंजिन असलेले विमान डिझाइन करावे लागेल, असे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे प्रमुख गिरीश देवधरे म्हणाले.

30 जुलै रोजी हवाई दलाने जम्मू आणि काश्मीरमधील अवंतीपोरा एअरबेसवर तेजस एमके -1 हलके लढाऊ विमान तैनात केले. वैमानिकांना दरीत उड्डाणाचा सराव करता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.