Maldives च्या राष्ट्रपतींचा नियुक्तीनंतर २४ तासांत निर्णय; घेतली भारतविरोधी भूमिका

राष्ट्रपतीपदी आल्यानंतर मोहम्मद मुइझ्झू यांनी 'मालदीवमध्ये कोणतेही विदेशी सैन्य असणार नाही याबाबत आम्ही खात्री करु', असे म्हटले होते. त्यानुसार मुइझ्झू यांनी मालदीवमधील भारतीय सैन्याला परत बोलवून घेण्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे.

83
Maldives च्या राष्ट्रपतींचा नियुक्तीनंतर २४ तासांत निर्णय; घेतली भारतविरोधी भूमिका
Maldives च्या राष्ट्रपतींचा नियुक्तीनंतर २४ तासांत निर्णय; घेतली भारतविरोधी भूमिका

मालदीवचे (Maldives) नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू (Mohammed Muizzou) यांनी भारताविषयी प्रतिकूल भूमिका घेतली आहे. मोहम्मद मुइझ्झू यांनी मालदीवमधील भारतीय सैन्याला (Indian Army) परत बोलवून घेण्याची औपचारिक विनंती भारत सरकारकडे केली आहे.

सत्तेत आल्यास भारतीय सैन्य परत पाठवण्याचे आश्वासन मुइझ्झू यांनी दिले होते. त्यानुसार ते आता नवी दिल्लीकडे यासंदर्भात मागणी करत आहेत. त्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) आणि मुइझ्झू यांची भेट झाली होती. राष्ट्रपतीपदी आल्यानंतर मुइझ्झू यांनी ‘मालदीवमध्ये कोणतेही विदेशी सैन्य असणार नाही याबाबत आम्ही खात्री करु’, असे म्हटले होते. त्यानुसार ते पावले उचलत आहेत. (Maldives)

(हेही वाचा – Indian Navy : गाझातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदल तयार)

मालदीवमध्ये भारतीय सैनिक

मालदीवमध्ये भारत पुरस्कृत रडार आणि विमानांच्या देखरेखीसाठी भारताचे ७० सैनिक तैनात आहेत. मालदीवमध्ये तैनात असलेली भारतीय युद्धनौका स्पेशल इकॉनॉमिक भागात देखरेख करण्यासाठी मदतीची ठरते.

संकटकाळात मानवीय मदत, आपत्ती मदतकार्य आणि बेकायदेशीर समुद्री घडामोडी यांचा सामना करण्यासाठी भारतीय सैनिकांची महत्त्वाची भूमिका आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांसाठी मालदीव सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. (Maldives)

(हेही वाचा – Indian Navy : गाझातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदल तयार)

माजी राष्ट्रपती अब्दु्ल्ला यामीन यांचे निकटवर्तीय

राष्ट्रपती मुइझ्झू हे इब्राहिम मोहम्मद यांना हरवून सत्तेत आले आहेत. माजी मंत्री आणि मालेचे महापौर राहिलेले मुइझ्झू हे माजी राष्ट्रपती अब्दु्ल्ला यामीन यांचे निकटवर्तीय आहेत. अब्दुल्ला यामीन यांनी २०१३ ते २०१८ या आपल्या कार्यकाळात चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. मुइझ्झू हेही अब्दुल्ला यामीन यांच्या विचारधारेचे आहेत.

अब्दुल्ला यामीन यांना भ्रष्टाचार आणि इतर काही प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यांना ११ वर्षे तुरुंगवास सुनावण्यात आल्यामुळे त्यांना निवडणूक लढता आली नाही. त्यामुळे त्यांनी मुइझ्जू यांना राष्ट्रपतीपदासाठी पुढे केले आहे. (Maldives)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.