Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान आसाममध्ये 

185
Urban Voters : शहरी मतदारांना मतदानासाठी उतरविण्याचे राजकीय पक्षांसमोर आव्हान

१८ व्या लोकसभा निवडणुकांचे एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापैकी मंगळवारपर्यंत तीन टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण ११ तर ९४ केंद्रशासित मतदारसंघात मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात एकूण ६१.४५ (3Rd Phase Voting 61.45) टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यात आसामध्ये (Assam) सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात (Maharashtra Lok Sabha) सर्वात कमी मतदान झाल्याचे चित्र बघायला मिळालं आहे.  (Lok Sabha Election 2024)

 (हेही वाचा – Indian Navy : दिल्ली, शक्ती आणि किल्तन भारतीय नौदलातील जहाजे सिंगापूर येथे पोहचली )

तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पूर्ण झाले असून, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आसामामध्ये सर्वाधिक ७५.२६ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच ५४.७७ टक्के मतदानाची नोंद झाली. तसेच बिहारमध्ये ५६.५५ टक्के, छत्तीसगडमध्ये ६६.९९ टक्के, दादरा नगरहवेलीमध्ये ६५.२३ टक्के आणि गोव्यात ७४.२७ टक्के मतदान झाले. याशिवाय गुजरातमध्ये ५६.७६ टक्के, कर्नाटकमध्ये ६७.७६ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ६३.०९ टक्के, उत्तर प्रदेशात ५७.३४ टक्के, तसेच पश्चिम बंगालमध्ये ७३.९३ टक्के मतदान झाल्याचं बघायला मिळालं. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Vijay Wadettiwar यांच्या अडचणीत वाढ; आता भाजपाकडून कायदेशीर नोटीस जारी)

महाराष्ट्रात एकूण ११ मतदारसंघात (11 constituencies in Maharashtra) मतदान झाले असून यामध्ये राज्यात तिसऱ्या टप्प्यांतील बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, धाराशिव, रायगड, रत्नागिरी – सिंधुदुर्ग, सांगली, सातारा व सोलापूर या लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. महत्त्वाचे म्हणजे २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. यावेळी त्रिपुरात सर्वाधिक ७७.५३ टक्के, तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी म्हणजेच ५२.७४ टक्के मतदानाची नोंद झाली होती. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.