Ashokbhau Savarkar : हिंदू महासभा आणि हिंदू राष्ट्र दलाचे कृतीशील कार्यकर्ते स्व. अशोकभाऊ नारायणराव सावरकर

मनमिळाऊ नि संघटक स्वभाव, तसेच कार्यकर्त्याला आवश्यक असणारी धडाडी यांमुळे युवा कार्यकर्त्यांना अशोकभाऊ हे प्रिय होते.

121
Ashokbhau Savarkar : हिंदू महासभा आणि हिंदू राष्ट्र दलाचे कृतीशील कार्यकर्ते स्व. अशोकभाऊ नारायणराव सावरकर
Ashokbhau Savarkar : हिंदू महासभा आणि हिंदू राष्ट्र दलाचे कृतीशील कार्यकर्ते स्व. अशोकभाऊ नारायणराव सावरकर

शिरीष शरद पाठक, नाशिक

जन्म : १९ नोव्हेंबर १९२७
मृत्यू : १४ सप्टेंबर २००३

क्रांतिकारक त्रिवर्ग सावरकर बंधू असलेले गणेशपंत, विनायकराव, तसेच नारायणराव यांच्यानंतर पुढील पिढीतील सर्वप्रथम अशोकभाऊ नारायणराव सावरकरांनी देशसेवेस प्रारंभ केला. विराग्रणी डॉ. नारायणराव सावरकरांना अनुक्रमे अशोक, विक्रम, श्रीहर्ष, चपला आणि निर्मला ही अपत्ये होती. या पाचही भावंडांत अशोकभाऊ हे ज्येष्ठ बंधू होय. उत्तम वक्ते, शांत स्वभाव, तीक्ष्ण बुद्धी असलेल्या अशोकभाऊ (Ashokbhau Savarkar) यांना लेखनाची प्रचंड आवड होती. यामुळेच कि काय त्यांचे राजकीय आकलन मूलगामी होते. याचा उपयोग त्यांना अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रचारक म्हणूनही झाला.

(हेही वाचा – ICC Cricket World Cup IND VS AUS : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य; खडतर परिस्थितीत शेवटपर्यंत खेळले)

सन १९४३ ते १९४५ या कालावधीत सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात अशोकभाऊ शास्त्रशाखेत शिक्षण घेत सांगलीतील हिंदु राष्ट्र दलाच्या (hindu rashtra dal) आणि हिंदू महासभेच्या (hindu mahasabha) कार्यात भाग घेऊ लागले. त्या पश्चात ते मुंबईस आल्यानंतर येथील हिंदू महासभा नि हिंदू राष्ट्र दलाच्या माध्यमातून ३० जानेवारी १९४८ पर्यंत सर्व क्षेत्रात कृतीशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले. (Ashokbhau Savarkar)

त्या वेळी हिंदू महासभेचा बोलबाला मजबूत असला, तरी स्वयंप्रेरणेने या पक्षाचे कोणत्याही प्रकारचे कार्य करण्यास सिद्ध असलेले कृतीशील कार्यकर्ते मात्र त्या मानाने कमी होते. मात्र अशोकभाऊ यास अपवाद ठरले.

(हेही वाचा – Yamunabai Savarkar : त्यागाचा अबोल आदर्श म्हणजे माई !)

नागपुरात पु.भा. भावे चालवीत असलेल्या ‘आदेश’ या अंकाच्या शेकडो प्रति दादरच्या स्थानकावर एक-दोन सहकाऱ्यांसह अशोकभाऊ विक्री करण्याचे काम करीत असत. मनमिळाऊ नि संघटक स्वभाव, तसेच कार्यकर्त्याला आवश्यक असणारी धडाडी यांमुळे युवा कार्यकर्त्यांना अशोकभाऊ हे प्रिय होते.

सन १९४७ रोजी भारताची फाळणी झाली. या घटनेमुळे १३ जुलै रोजी हिंदू महासभेने फाळणीच्या निषेधार्थ काळा दिवस यशस्वी करण्याचा म्हणजेच बंद पाळण्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजिला. दिनांक ३० आॅक्टोबर १९४८ यावर्षी डॉ. सावरकरांच्या घरावर झालेल्या भयंकर हल्ल्यात डॉ. नारायणराव (Narayan Savarkar) जखमी होऊन बेशुद्ध झाले होते. त्यात त्यांची प्रकृती अत्यंत बिघडल्याने त्यांचे दुःखद निधन झाले. या घटनेनंतर घरातील कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी अशोकभाऊंना आपले शिक्षण अर्धवट सोडून नोकरी स्वीकारावी लागली. येथूनच पुढे अशोकभाऊंचे राजकीय कार्य थांबले.

(हेही वाचा – Veer Savarkar : युवकांना सावरकर समजले नाहीत, हा सरकारी शिक्षणव्यवस्थेचा पराभव – रणजित सावरकर)

स्व. अशोकभाऊ नारायणराव सावरकर हे उत्तम लेखक होते. १९६८ यावर्षी आपले द्वितीय बंधू विक्रमराव सावरकरांनी हिंदुत्वाच्या प्रचारासाठी सुरू केलेल्या साप्ताहिक ‘प्रज्वलंत’मध्ये अशोकभाऊंनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखनही केले. अशोकभाऊ आणि श्रीहर्ष या दोहोंच्या सातत्यातील प्रोत्साहनामुळेच विक्रमराव सावरकर हे हिंदू महासभेचे कार्य करू लागले. हिंदू महासभेत कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना अशोकभाऊ यांनी बहुमोल सहकार्य दिलेले आहे.

स्व. अशोकभाऊ नारायणराव सावरकर यांचा विवाह १९८० या वर्षी पुण्यातील गोपाळराव गोडसे यांच्या कन्या असिलता (हिमानीताई) यांच्याशी संपन्न झाला. विवाहापश्चात पुण्यात राहून त्यांनी राजकीय, सामाजिक नि सांस्कृतिक क्षेत्रात विविध कार्य केली. हे सर्व महत्कार्य करत असता त्यांनी आपली पत्नी हिमानीताईंनादेखील (Himani Savarkar) सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन दिले. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करत असता त्यांनी पुण्यातील महिला हिंदू महासभेचे दायित्वदेखील उत्तमपणे सांभाळले होते. कालांतराने या दांपत्यांना सात्यकी हे सुपुत्र लाभले.

(हेही वाचा – दिल्ली पालिकेच्या बगीचावर Jama Masjid चे अतिक्रमण; काय म्हणते Delhi High Court)

अशोकभाऊ हे वडील डॉ. नारायणरावांप्रमाणेच इतरांसाठी नि आपल्या कुटुंबाचे उत्तरदायित्व स्विकारत सर्व भावंडांसाठी त्यांवर कुठलाही गाजावाजा अन् कसलाही अधिकार न गाजविता प्रसंगी संपूर्णत: नामनिराळे राहिले.

आयुष्यभर कष्ट केलेले मन आणि शरीर काही प्रमाणात सुखावले. परंतु त्यांना असलेला मधुमेह आणि रक्तदाब या रोगांनी त्यांना अक्षरशः विफल केले. परंतु तरीदेखील विविध ठिकाणी होत असलेली त्यांची भाषणे, सातत्याने होणाऱ्या गाठीभेटी आणि प्रचार प्रसार, बैठकीतील विविध विषयांवरील चर्चा, त्यांची सुरू असलेले अविरत वाचन नि लेखन अशा विविध मार्गांनी ते हिंदुत्वनिष्ठ राजकारणात काहीशा प्रमाणात कार्यरत राहिले. प्रसंगी लहान मोठ्या आंदोलनात सहभागीदेखील होत.

सावरकर घराण्यातील राष्ट्रकार्याचा वसा आणि हिंदुत्वनिष्ठ राजकारणातील एक खंदा कार्यकर्ता असलेल्या नि आपल्या संपूर्ण आयुष्यात निरलस कार्य करणाऱ्या अशोकभाऊ नारायणराव सावरकर यांनी दिनांक १४ सप्टेंबर २००३ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपवली. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन…..! (Ashokbhau Savarkar)

• संदर्भ :
१) स्व. विक्रमराव सावरकर लिखित ‘कवडसे’
२) अनुराधाताई खोत लिखित ‘मनस्वी’
३) स्व. कमल द. काळे लिखित आणि सौ. अपर्णाताई चोथे संपादित ‘हरीदिनी’
४) सावरकर परिवार विशेषांक-२०२१ तील क्रांतीगीताताई महाबळ यांचा लेख

• विशेष आभार :
सौ. क्रांतीगीताताई महाबळ, पुणे

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.