दिल्ली पालिकेच्या बगीचावर Jama Masjid चे अतिक्रमण; काय म्हणते Delhi High Court

देहलीतील प्रसिद्ध जामा मशिदीजवळील (Jama Masjid) एका बगीचावर मशिदीने ताबा मिळवला आहे. याविषयी महंमद अर्सलान या व्यक्तीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

75
दिल्ली पालिकेच्या बगीचावर Jama Masjid चे अतिक्रमण; काय म्हणते Delhi High Court
दिल्ली पालिकेच्या बगीचावर Jama Masjid चे अतिक्रमण; काय म्हणते Delhi High Court

‘जेथे कायद्याचे राज्य नाही, आम्ही अशा युगात रहात नाही. मग महापालिका बगीचा अतिक्रमण मुक्त करून स्वतःकडे का घेऊ शकली नाही ?’, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) महापालिकेला फटकारले आहे.

देहलीतील प्रसिद्ध जामा मशिदीजवळील (Jama Masjid) एका बगीचावर मशिदीने ताबा मिळवला आहे. याविषयी महंमद अर्सलान या व्यक्तीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी करतांना न्यायालयाने दिल्ली महापालिकेला बगीचावरील अतिक्रमण न हटवल्यावरून फटकारले आहे.

(हेही वाचा – …तर आदित्य ठाकरेंनी तरुंगात जावे; Nitesh Rane यांचा हल्लाबोल)

सुनावणीच्या वेळी महापालिकेने न्यायालयाला सांगितले की, बगीचावर जामा मशिदीचे व्यवस्थापन आणि शाही इमाम यांनी बेकायदेशीर नियंत्रण ठेवले आहे. त्यांनी त्याला टाळेही ठोकले आहे. तेथे महापालिकेच्या अधिकार्‍यांना प्रवेश दिला जात नाही. दुसरीकडे दिल्ली वक्फ बोर्डही (Dehli Waqf Board) त्यावर स्वतःची संपत्ती असल्याचा दावा करत आहे. (Delhi High Court)

महापालिकेचे म्हणणे ऐकून उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ‘सार्वजनिक बगीचावर कुणी कसे काय नियंत्रण मिळवू शकते ? पालिकेने कायद्यानुसार बगीचा नियंत्रणात घेण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जर पोलिसांची आवश्यकता आहे, तर तीही दिली जाईल. अशा प्रकारे सार्वजनिक बगीचावरचा अधिकार प्रशासन सोडून देऊ शकत नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे.  (Delhi High Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.