…तर आदित्य ठाकरेंनी तरुंगात जावे; Nitesh Rane यांचा हल्लाबोल

12
लोअर पुलावरून राजकारण तापले आहे. गेली ५ वर्षे  बंद असलेल्या या उड्डाण पुलाची एक बाजू काही महिन्यांपूर्वी वाहनांसाठी सुरु करण्यात आली होती. आता दुसरी बाजू आदित्य ठाकरे यांना परवा उघडी केल्यानंतर त्यांच्यावर पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. यावर भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले कि, मुंबईची इतकी चिंता असेल तर आदित्य ठाकरे यांनी जामीन न घेता तुरुंगात जावे, असे म्हटले.
महाविकास आघाडीची सत्ता असताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांची इतकी चिंता कधी केली नाही. तेव्हा त्यांना बॉलिवूडच्या पार्ट्यांमधून कधी वेळ मिळायचा नाही. रात्री डेव्हिड बॅकहॅमच्या मांडीवरून उतरून लोअर परळ पुलाचे अनधिकृतपणे उदघाटन केले, अशी टीका भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. आदित्य ठाकरे यांनी लक्षात घ्यावे कि, मुंबई त्यांच्या बापाची नाही, ती मुंबईकरांची आहे. इथे चमकोगिरी चालणार नाही. आता महायुतीचे सरकार आहे, कायदा तोडला तर शिक्षा होईल, असेही नितेश राणे  (Nitesh Rane) म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी मुंबईची इतकीच चिंता असेल तर त्यांनी जामीन न घेता तुरुंगात जावे, असे आव्हानही नितेश राणे यांनी केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.