Anjali Damania यांच्या आरोपावर समीर भुजबळ यांचा खुलासा; म्हणाले, हा बदनामीचा कट

12

आम्ही फर्नांडिस कुटुंबियांचा मोबदला रहेजा आणि नरोना यांना दिला होता. पुन्हा एकदा जेव्हा इमारतीचे काम पूर्ण झाले, तेव्हा २०१४ मध्ये मोबदला घ्या म्हणालो होतो, त्यावेळी त्यांनी संपूर्ण कागदपत्रांवर सह्या केलेल्या होत्या. आम्ही सहानुभूतीपूर्वक मोबदला देणार होतो, तो राहून गेला. जागा घ्या किंवा पैसे घ्या, असे आम्ही म्हणत होतो, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ म्हणाले.

अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आमच्यावर अनेक आरोप केले, त्यामुळे आमच्या मालमत्ता ईडीने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्येच ही इमारत आहे. आता दमानिया (Anjali Damania) यांनी आमच्याविरोधात कारस्थान रचले आहे. फर्नांडिस कुटुंबीयांनी या प्रकरणी न्यायालयात कन्सेंट टर्म्स फाईल करून सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स या रहेजा बंधूंच्या कंपनीसोबत व्यवहार केला होता, त्यांनी १० वर्षे काहीही काम केले नसल्यामुळे फर्नांडिस दाम्पत्य हे नव्या डेव्हलोपर्सच्या शोधात होते. त्या कामी त्यांना फ्रेडरिक या सोसायटीच्या सचिवांना नवीन डेव्हलपर शोधावा यासाठी विनंती केली. त्यानुसार आमच्या मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या संपर्कात ते आले, असे समीर भुजबळ म्हणाले.

(हेही वाचा …तर आदित्य ठाकरेंनी तरुंगात जावे; Nitesh Rane यांचा हल्लाबोल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.