ICC Cricket World Cup IND VS AUS : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य; खडतर परिस्थितीत शेवटपर्यंत खेळले

98

अवघ्या जगाचे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे (ICC Cricket World Cup IND VS AUS) लक्ष लागले आहे. या सामन्यात नाणेफेकी जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षण स्वीकारले, मात्र त्याचा भारताला उपयोग होईल अशी शक्यता वाटत होती, मात्र ती फोल ठरली, अत्यंत नियोजनबद्धपणे क्षेत्ररक्षण, भेदक गोलंदाजी आणि खेळाडूनुसार ठरवलेली रणनीती या ऑस्ट्रेलियाच्या खेळाने भारताला अवघ्या २४० धावांमध्ये रोखण्यात त्यांना यश आले.

ICC Cricket World Cup IND VS AUS या सामन्यात भारताची सुरुवातीची रणनीती अयशस्वी ठरली. सुरुवातीच्या पॉवर प्ले मध्ये जोरदार फटकेबाजी करून १००-१५० धावा बनवायच्या, हि आजवरची रणनीती या अंतिम सामन्यातही ठरवली. हाच उद्देश घेऊन रोहित शर्माने फटकेबाजी सुरु केली, पण अत्यंत चुकीच्या फटक्यामध्ये रोहित ४७ धावांवर बाद झाला. त्याआधी गिल बाद झाला होता. पाठोपाठ श्रेयस अय्यरही जोरदार फटाके मारण्याच्या नादातच बाद झाला. ही पडझड अशीच सुरु राहिली आणि विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा बाद झाले. यात कोहली, के एल राहुल यांनी काही प्रमाणात धाव फलक धावता ठेवला, पण के एल राहुल बाद झाल्यानंतर मात्र भारत २७०-२७५ ची धावसंख्या गाठेल अशी शक्यता मावळली. त्यानंतर सूर्यकुमार यादवला या सामन्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती, पण त्याने सूपला फटका मारण्याची हौस पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि विकेटकिपरकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर मात्र कुलदीप आणि सिराज यांनी शेवटपर्यंत ५० षटके खेळून काढली आणि भारताने ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे आव्हान उभे केले.

(हेही वाचा World Cup 2023 Final Ind vs Aus : अंतिम सामन्याच्या सुरुवातीला शानदार एअर शो)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.