निसर्ग आणि प्रेम कवी Sumitra Nandan Pant

सुमित्रानंदन यांना भारतातल्या ग्रामीण भागातील निसर्ग सौंदर्याबद्दल असीम प्रेम होते.

166
निसर्ग आणि प्रेम कवी Sumitra Nandan Pant
सुमित्रानंदन पंत हे एक भारतीय कवी होते. ते विसाव्या शतकातील हिंदी भाषेतले सर्वात प्रसिद्ध कवी Poet होते. त्यांच्या कवितांमध्ये प्रेमभाव हा प्रामुख्याने दिसून यायचा. त्यांच्या कविता निसर्ग आणि प्रेमळ माणसे यांच्याकडून प्रेरित झालेल्या असायच्या. सुमित्रानंदन पंत याचे वडील एक चहाच्या मळ्याचे व्यवस्थापक म्हणून काम पहायचे. पण ते सावकारही होते. म्हणून सुमित्रानंदन यांना आर्थिकदृष्टीने संघर्ष करण्याची कधीच गरज भासली नाही. सुमित्रानंदन यांना भारतातल्या ग्रामीण भागातील निसर्ग सौंदर्याबद्दल असीम प्रेम होते. ते त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. (Sumitra Nandan Pant)
सुमित्रानंदन यांचा जन्म २० मे १९०० रोजी कौसनी येथे झाला. त्याचं शालेय शिक्षण त्यांच्या राहत्या गावातच झालं. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी बनारस इथल्या क्विन्स कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. तिथे त्यांनी रवींद्रनाथ ठाकूर, सरोजिनी नायडू यांच्या कविता वाचायला सुरुवात केली. तसेच त्यांनी अनेक इंग्रजी भाषेतल्या कवींच्याही रोमँटिक धाटणीच्या कविता वाचून काढल्या. त्यामुळे त्यांच्या कवितांवरही प्रेम भावाचा मोठा प्रभाव दिसून येतो.
१९१९ साली सुमित्रानंदन हे अलाहाबाद इथल्या मुईर कॉलेजमध्ये गेले. पण फक्त दोनच वर्षं ते कॉलेज मध्ये गेले. त्यानंतर त्यांनी फक्त आपल्या कवितांवर लक्ष केंद्रित केलं. १९२६ साली त्यांचं ‘पल्लव’ नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुमित्रानंदन यांनी हिंदी कवींविषयी खेद व्यक्त केला की, “हिंदी कवी हे विचार एका भाषेत करतात आणि व्यक्त होताना दुसरीच भाषा वापरतात.” त्यांना वाटले की, ब्रज भाषा ही कालबाह्य झाली आहे म्हणून त्यांनी नवी राष्ट्रभाषा वापरण्याची सुरुवात करण्यासाठी हातभार लावला.
सुमित्रानंदन पंत हे १९३१ साली कलांकर येथे गेले. नऊ वर्षं ते तिथे निसर्गाच्या सान्निध्यात एकांतात राहिले. सुमित्रानंदन हे १९४१ साली अल्मोडा येथे परतले तिथे त्यांनी उदय शंकर कल्चरल सेंटरमध्ये नाटक वर्गात भाग घेतला. त्यांनी अरविंदोंचे ‘द लाईफ डिव्हाईन’ नावाचं पुस्तकही वाचलं. या पुस्तकाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. तीन वर्षांनंतर ते मद्रास, पाँडेचेरी आणि त्यानंतर अरबिंदोंच्या आश्रमात गेले. १९४६ साली सुमित्रानंदन हे अलाहाबादला परतले आणि देशातील इतर आघाडीच्या लेखकांमध्ये टिकून राहण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने आपलं लिखाण सुरू केलं. (Sumitra Nandan Pant)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.