Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून; ५ राज्यांतील निवडणुकांचा होणार परिणाम

102

5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू होणार आहे. लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कोण अधिक आक्रमक भूमिका घेते हे निवडणुकीचे निकालच ठरवतील. विरोधक जे मुद्दे उपस्थित करू शकतात त्यात जात जनगणनेची मागणी सर्वात प्रमुख आहे. ED, CBI आणि IT सारख्या केंद्रीय एजन्सींच्या कथित एकतर्फी कृतींविरोधात ‘इंडिया’ आघाडी एकवटली आहे.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच, तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पैशासाठी प्रश्न विचारल्याचा आरोप झाला आणि आचार समितीने त्यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार राघव यांच्या निलंबनाचा मुद्दाही गाजण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विरोधकांकडून संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे. या अधिवेशनात समान नागरी संहितेवरही भाजप चर्चेला सुरुवात करू इच्छित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, विधी आयोगाने अद्याप या मुद्द्यावर आपला अहवाल सरकारला सादर केलेला नाही. याशिवाय सरकार हिवाळी अधिवेशनात IPC, CrPC आणि पुरावा कायद्याशी संबंधित तिन्ही विधेयके मंजूर करू शकते.

(हेही वाचा Ind vs Aus : पॅलेस्टाईन समर्थकाने मैदानात पोहोचून केले ‘हे’ कृत्य; सुरक्षेत मोठी चूक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.