Lok Sabha Election 2024: दिल्ली कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा भाजपामध्ये प्रवेश, ‘या’ ४ नेत्यांचाही प्रवेश

लवली यांनी २०१७ मध्ये कॉंग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता अरविंदर सिंग लवली यांची भाजपामधील ही दुसरी इनिंग आहे.

80
Lok Sabha Election 2024: दिल्ली कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा भाजपामध्ये प्रवेश, 'या' ४ नेत्यांचाही प्रवेश

दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी शनिवारी, (४ मे) भाजपामध्ये प्रवेश केला. ‘आप’शी युती केल्यामुळे त्यांनी ६ दिवसांपूर्वी म्हणजेच २८ एप्रिल रोजी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. तेव्हा त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले होते. लवली यांच्यासोबत नीरज बसोया, राजकुमार चौहान, नसीब सिंग आणि अमित मलिक यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. (Lok Sabha Election 2024)

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर लवली म्हणाले, “आम्हाला भाजपाच्या बॅनरखाली आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जनतेसाठी लढण्याची संधी देण्यात आली आहे. मला पूर्ण आशा आहे की, देशात भाजपाचे सरकार स्थापन होईल. आगामी काळात भाजपाचा झेंडा दिल्लीतही फडकणार आहे. (Lok Sabha Election 2024)

लवली यांनी २०१७ मध्ये कॉंग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता अरविंदर सिंग लवली यांची भाजपामधील ही दुसरी इनिंग आहे. लवली यांनी ७ वर्षांपूर्वी १८ एप्रिल २०१७ रोजी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, १० महिन्यांनंतर त्यांनी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी लवली यांना दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले. (Lok Sabha Election 2024)

२८ एप्रिल रोजी त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना चारपानी पत्र लिहून पक्ष प्रभारींवर मनमानी केल्याचा आरोप केला होता. मला ब्लॉक अध्यक्ष नेमण्याचाही अधिकार नाही, असे ते म्हणाले होते. याशिवाय लवली यांनी आपसोबतच्या युतीवरही आक्षेप व्यक्त केला होता.

(हेही वाचा – Onion Export : कांदे निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क )

लवली यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, दिल्ली काँग्रेस युनिट काँग्रेस पक्षावर खोटे, बनावट आणि दुर्भावनापूर्ण भ्रष्टाचाराचे आरोप करण्याच्या आधारावर स्थापन झालेल्या पक्षाशी युतीच्या विरोधात आहे. असे असतानाही पक्षाने दिल्लीत ‘आप’ सोबत युती करण्याचा निर्णय घेतला.

लवली यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने ३० एप्रिल रोजी देवेंद्र यादव यांची दिल्ली युनिटचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. दिल्लीत लोकसभेच्या ७ पैकी ४ जागांवर आप निवडणूक लढवत आहे, तर काँग्रेस ३ जागांवर दिल्लीत लोकसभेच्या ७ जागा आहेत. महाआघाडीअंतर्गत आप ४, तर काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने चांदनी चौकातून जेपी अग्रवाल, उत्तर-पूर्व दिल्लीतून कन्हैया कुमार आणि उत्तर-पश्चिम दिल्लीतून उदित राज यांना उमेदवारी दिली आहे. २५ मे रोजी दिल्लीत सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.