Paris Olympic 2024 : भारत मुष्टीयुद्धातील एक ऑलिम्पिक कोटा गमावण्याच्या बेतात

Paris Olympic 2024 : परवीन हुडा या मुष्टीयोद्धावर वाडाने तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली आहे.

68
Paris Olympic 2024 : भारत मुष्टीयुद्धातील एक ऑलिम्पिक कोटा गमावण्याच्या बेतात
  • ऋजुता लुकतुके

भारताची विश्वविजेतपद स्पर्घेत कांस्य पदक जिंकलेली मुष्टीयोद्धा परवीन हुडा सध्या वाडाच्या म्हणजेच उत्तेजक चाचणी विरोधी यंत्रणेच्या रडावर आहे. एका वर्षांत तीन वेळा आपला निवासाचा पत्ता आणि ठिकाण न कळवल्यामुळे तिच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात तिने ऑलिम्पिक पात्रता कोटा मिळवला होता. पण, एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत तिने नाडा या राष्ट्रीय संस्थेला आपलं निवासाचं ठिकाण आणि पत्ता न कळवल्यामुळे वाडाच्या व्हेअरअबाऊट नियमाचा भंग होत आहे. (Paris Olympic 2024)

‘वाडाने परवीनवर दीड वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे आणि कारवाईची मुदत नोव्हेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. याच महिन्यात निलंबन लागू झालं आहे,’ असं परवीनचे प्रशिक्षक सुधीर हुडा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. वाडाकडे नोंदणी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेल्या खेळाडूंसाठी ते राहत असलेलं ठिकाण आणि त्याचा पत्ता वेळोवेळी कळवणं तसंच सरावाचं आणि तयारीच्या ठिकाणाची माहिती देणं हे अनिवार्य आहे. किती काळ तुम्ही एखाद्या ठिकाणी राहणार असाल ती वेळही यात द्यावी लागते. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – IPL 2024, LSG bt MI : लखनौकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स तळाला)

खेळाडूची अचानक उत्तेजक द्रव्य चाचणी घ्यायची झाल्यास, वाडाला ही माहिती आवश्यक आहे. १२ महिन्यांच्या कालावधीत तीनदा ही माहिती दिली नाही तर उत्तेजक द्रव्य सेवनाच्या पहिल्या गुन्ह्याइतकी शिक्षा या चुकीसाठी होऊ शकते आणि परवीनकडून नेमकी तीच चूक घडली आहे. त्यामुळे दीड वर्षांच्या निलंबनाला तिला सामोरं जावं लागणार आहे. पण, त्यामुळे तिने जिंकलेला ऑलिम्पिक कोटाही भारताच्या हातातून जाऊ शकतो. परवीनची शिक्षा माफ व्हावी किंवा ती कमी व्हावी असा तिच्या वकिलांचा प्रयत्न आहे. पण शिक्षा एका वर्षांपुरती उरली तरी परवीनला ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येणार नाही. सध्या निखत झरिन (५० किलो), प्रीती (५५ किलो), परवीन (५७ किलो) आणि लवलिना (७५ किलो) या महिला खेळाडूंना ऑलिम्पिक कोटा मिळाला आहे. मुष्टीयुद्ध खेळात मिळालेला कोटा हा देशाचा नसून खेळाडूचा असतो. त्यामुळे तिच्या जागी दुसरी खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करू शकणार नाही. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.