BEST Bus मध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक 

अनेक वेळा प्रवासादरम्यान हर्षित पानवाला याला बेस्ट बस चालकाच्या गलथान प्रकारामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे त्याने धमकीचा मेल पाठवला होता.

738
BEST Bus मध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक 
वडाळा बस आगाराला आलेल्या धमकीच्या ई-मेलने शुक्रवारी मुंबईत एकच खळबळ उडवून दिली होती. नेरुळ येथून मुलुंड पश्चिम दरम्यान धावणाऱ्या बेस्ट बस मध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचे ई-मेल मध्ये म्हटले होते. पोलिसांनी संपूर्ण बस तपासली असता या बसमध्ये संशयास्पद काहीही मिळून आलेले नाही. दरम्यान नवी मुंबई एटीएसने ई-मेल पाठविणाऱ्याचा शोध घेऊन नेरुळ येथून २१ वर्षीय विद्यार्थ्यांला अटक ककरून पुढील तपासासाठी त्याचा ताबा रफी किडवाई मार्ग पोलिसांकडे देण्यात आला आहे. (BEST Bus)
हर्षीत पानवाला (२१) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथे राहणारा हर्षित हा बीएससीच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. शिक्षणासोबत तो वाशी येथे एका डॉक्टरकडे कामाला जातो. हर्षित हा दररोज नेरुळ येथून वाशीला जाण्यासाठी बेस्ट बस मार्ग क्रमांक ५१२ या बसने प्रवास करतो. अनेक वेळा प्रवासादरम्यान हर्षितला बेस्ट बस चालकाच्या गलथान प्रकारामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. (BEST Bus)
असा लागला शोध 
बस चालक बस थांब्यावर बस थांबवत नव्हते, तर अनेक वेळा बस पकडताना तो पडला होता. बस चालकाच्या या गलथान प्रकारामुळे वैतागलेल्या हर्षित याने शुक्रवारी वडाळा बस आगाराला ई-मेल केला व बस क्रमांक ५१२ मध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला असून कुठल्याही क्षणी बस बॉम्बने उडविण्याची धमकी ई-मेल मध्ये देण्यात आली होती. या ई-मेल मुळे वडाळा बेस्ट बस आगारात एकच खळबळ उडाली होती, आगार व्यवस्थापक यांनी तात्काळ या ई-मेलची सूचना रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांना दिली. (BEST Bus)
रफी किडवाई मार्ग पोलिसांनी तात्काळ मुलुंड पोलीस ठाण्याच्या याबाबतची सूचना देण्यात आली असता मुलुंड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी तात्काळ बस सुरक्षित ठिकाणी थांबवून बसची तपासणी केली असता बसमध्ये संशयास्पद काहीही आढळून आले नसल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली. नवी मुंबई एटीएसच्या पथकाने वडाळा बस आगाराला आलेल्या ई-मेलची माहिती काढून नेरुळ येथून हर्षित पानवाला याला अटक करून रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. रफी किडवाई मार्ग पोलिसांनी हर्षित पानवाला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती रफी किडवाई मार्ग पोलिसांनी दिली आहे. (BEST Bus)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.