North East Mumbai LS Constituency : ईशान्य मुंबईत संजय पाटील नावाचे ५ उमेदवार

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेना उबाठा पक्षाकडून संजय पाटील तर भाजपाच्यावतीने महायुतीचे उमेदवार म्हणून मिहिर कोटेचा यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे.

178
North East Mumbai Lok Sabha Election 2024 : संजय पाटील यांना उबाठा शिवसैनिकच आपले मानतात?

उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईतून शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने संजय दिना पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले त्यांना भाजपाचे मिहिर कोटेचा यांचे प्रमुख आव्हान आहे. मात्र, या मतदार संघात चार संजय पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले असून यासर्व संजय पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे मिहिर कोटेचा आणि संजय पाटील यांच्यात ही लढत असतानाच या निवडणुकीत लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र नंदेश उमप यांनीही बहुजन समाज पार्टीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे संजय पाटील यांच्या नावाने उभे राहिले उमेदवार किती मत खातात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (North East Mumbai LS Constituency)

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेना उबाठा पक्षाकडून संजय पाटील तर भाजपाच्यावतीने महायुतीचे उमेदवार म्हणून मिहिर कोटेचा यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी ३ मेचा शेवटचा दिवस होता. तोपर्यंत या मतदार संघातून अनेक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या नावाशी सार्धम्य असलेले चार आणखी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. (North East Mumbai LS Constituency)

नॅशनल पिपल्स पार्टीच्यावतीने संजय बंडू पाटील, अपक्ष उमेदवार संजय महादेव पाटील, अपक्ष उमेदवार संजय पांडुरंग पाटील, अपक्ष उमेदवार संजय निवृत्ती पाटील असे चार संजय पाटील नावाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच अपक्ष माजी नगरसेवक सिराज शेख यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे गोवंडीतील मतदारांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. (North East Mumbai LS Constituency)

यावर प्रतिक्रिया देताना संजय दिना पाटील यांनी यावरून कुणाच्या पायाखालील वाळू सरकली आहे हे यावरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. (North East Mumbai LS Constituency)

(हेही वाचा – Indian Army: भारतीय लष्कराच्या विमानाचे तातडीने करावे लागले लँडिंग, कारण काय?)

नंदेश उमपांनी भरला उमेदवारी अर्ज

या लोकसभा मतदार संघातून शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र शाहीर नंदेश उमप यांनी आपला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करत या निवडणुकीत उडी घेतली आहे. उमप विक्रोळीत राहणार असून त्यांची किर्ती चांगल्याप्रकारे असल्याने या मतदार संघात ते चांगल्याप्रकारे मते घेऊ शकतात आणि त्याचा फटका संजय पाटील यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमप यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. ज्यामध्ये सन २०१८-१९मध्ये उमप यांची मालमत्ता ५लाख ९६ हजार ९०५ एवढी होती, जी आता वाढून सन २०२३-२४मध्ये ही संपत्ती ५४ लाख ०७ हजार एवढी आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ७ लाख ३१ हजार ६०० रुपये आहे. (North East Mumbai LS Constituency)

यामध्ये नंदेश उमप यांच्या नावे एकूण संपत्ती ८० लाख ६४ हजार रुपयांची तर त्यांच्या पत्नीच्या नावे २३ लाख ३२ हजार रुपये एवढी आहे. तर स्थावर मालमत्ता ८२ लाख ३३ हजार रुपये तर त्यांच्या पत्नीच्या नावे ८० लाख ५० हजार एवढी संपत्ती असल्याचे नमुद केले आहे. (North East Mumbai LS Constituency)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.