Mutual Fund : भारतीय म्युच्युअल फंड संस्थांना परदेशी फंडांत गुंतवणुकीची परवानगी?

Mutual Fund : भारतीय म्युच्युअल फंड कंपन्यांना परदेशी फंडात गुंतवणुकीची परवानगी देण्याचा सेबीचा विचार आहे. 

83
Mutual Fund : भारतीय म्युच्युअल फंड संस्थांना परदेशी फंडांत गुंतवणुकीची परवानगी?
  • ऋजुता लुकतुके

जे परदेशी फंड किंवा युनिट ट्रस्ट भारतातील रोखे किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करतात, अशा फंडांमध्ये भारतीय म्युच्युअल फंडांना गुंतवणुकीची परवानगी देण्यावर सेबी विचार करत आहे. अशा परदेशी फंडांनी किमान २० टक्के गुंतवणूक ही भारतीय बाजारात केलेली असली पाहिजे, अशी अटही सेबी घालणार आहे. (Mutual Fund)

१७ मे ला काढलेलं सेबीचं एक पत्रक मीडियासमोर आलं आहे. यात सेबीने स्पष्ट केलं आहे की, ‘भारतीय कंपन्यांना परदेशी फंडांत गुंतवणूक करण्याची परवानगी नाही असं नाही. पण, ते शक्यतो गुंतवणूक करत नाहीत. त्यासाठी आता भारतीय कंपन्यांचं मन तयार केलं जाईल.’ (Mutual Fund)

(हेही वाचा – Rs 97 Crore House : हिरे व्यापाऱ्याने मुंबईत घेतलं ९७ कोटी रुपयांचं घर)

याला म्हणतात फंड ऑन फंड्स

म्युच्युअल फंड कंपन्यांचा पोर्टफोलिओ त्यामुळे विस्तारेल, असं सेबीला वाटतं. सेबीने त्यासाठी एक उदाहरणही दिलं आहे. एमएससीआय इमर्जिंग मार्केट इंडेक्स या इंडेक्समध्ये १८.०८ टक्के वाटा हा भारतीय शेअर बाजाराचा आहे. तर जेपी मॉर्गन कंपनीचा इमर्जिंग मार्केट फंडही जवळ जवळ १५ टक्के गुंतवणूक भारतीय रोख्यांमध्ये करतो. अशा फंडांत भारतीय म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक केली तर त्यांचा विस्तारच होईल, असं सेबीने म्हटलं आहे. (Mutual Fund)

परदेशी कंपन्यांमध्ये जशी भारतीय म्युच्युअल फंडांची गुंतवणूक असते तशीच ती परदेशी फंडांत असावी असा हा विचार आहे. याला आंतरराष्ट्रीय बाजारात फंड ऑन फंड्स असं म्हणतात. ग्राहकांच्या आणि फंडांच्याही सुरक्षिततेसाठी परदेशी फंडांची भारतातील कमाल गुंतवणूक २० टक्के असावी असा नियम यासाठी घालून देण्याचा सेबीचा विचार आहे. अर्थात, हा प्रस्ताव आधी केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी जाईल आणि अर्थ मंत्रालयाच्या परवानगी नंतरच याची अंमलबजावणी करता येऊ शकेल. (Mutual Fund)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.