Dawood Ibrahim : भारताच्या अजून एका शत्रूचा अंत होणार ? अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग

मीडिया रिपोर्टनुसार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आला असून त्याला पाकिस्तानच्या कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र पाकिस्तानने अद्याप अधिकृतरित्या याची पुष्टी केलेली नाही.

417
Dawood Ibrahim : भारताच्या अजून एका शत्रूचा अंत होणार ? अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) अनेक दशकांपासून पाकिस्तानात असल्याची माहिती आहे. मात्र पाकिस्तान सरकारने ही गोष्ट नाकारली आहे. अशातच आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) कराची येथील रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भारताच्या अजून एका शत्रूचा लवकरच अंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचा – Article 370 : देशाला लागलेला कलम ३७० रूपी कर्करोग काढून टाकणे आवश्यकच होते !)

एकीकडे भारताविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी एटीएस म्हणजेच दहशतवादी विरोधी पथकाची मोहीम सुरु आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान मधून दाऊदच्या (Dawood Ibrahim) विषबाधेची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

भारतात दहशत निर्माण करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना

भारतीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) कराचीच्या महागड्या क्लिफ्टन भागात राहत आहे. दरम्यान जानेवारी २०२३ मध्ये, त्याच्या पुतण्याने राष्ट्रीय तपास संस्थेला सांगितले की दाऊदने पाकिस्तानमध्ये पुनर्विवाह केला होता आणि तो आपल्या कुटुंबासह कराचीमध्ये राहतो. तपास संस्थेने पुढे दावा केला की, डी-कंपनीने राजकीय नेते आणि व्यावसायिकांसह प्रतिष्ठित व्यक्तींवर हल्ला करून भारतातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी एक विशेष पथकाची स्थापना केली आहे.

(हेही वाचा – PoK : जम्मू-काश्मीरच्या प्रगतीमुळेच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल!)

दाऊदच्या कंपनीचे अजूनही मुंबईशी संबंध

तसेच दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याची डी-कंपनी अजूनही मुंबईतील अनेक गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवते, ज्यात अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रे, बनावट वस्तू इत्यादींचा समावेश आहे, असे जागतिक दहशतवाद निर्देशांक (जीटीआय) च्या १० व्या आवृत्तीत नमूद केले आहे. या गुन्हेगारी संघटनेचे अल-कायदासह जागतिक दहशतवादी गटांशी दृढ संबंध असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(हेही वाचा – POK : पाकव्याप्त काश्मिरात कधीही तिरंगा फडकेल; केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा दावा)

पाकिस्तानात इंटरनेट बंद

रविवार १७ डिसेंबर रोजी पाकिस्तानमध्ये दोन मोठ्या घटना घडल्या, ज्या सध्या इंटरनेट बंदीशी जोडल्या जात आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने पाकिस्तानची पहिली वर्चुअल सभा घेतली. तर दुसरीकडे, मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) विषप्रयोग करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर काल रात्री पाकिस्तानात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम वापरण्यात अडचणी आल्या. इस्लामाबाद, लाहोर, कराचीसारख्या शहरांमध्येही रात्री ८ वाजेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.