Ahmednagar-Kalyan Highway Accident : अहमदनगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू

अहमदनगर-कल्याण मार्गावर रविवारच्या (१७ डिसेंबर) रात्री भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील चौघांसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आली आहेत. गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५ वर्ष ) हर्षद मस्करे (वय ४ वर्ष) काव्या मस्करे (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नावे अद्याप समोर आली नाही.

230
Ahmednagar-Kalyan Highway Accident : अहमदनगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू

रविवारी (१७ डिसेंबर) रात्री नगर-कल्याण महामार्गावर (Ahmednagar-Kalyan Highway Accident) एका ट्रकने रिक्षा आणि पिकअपला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: हमासला मोठा धक्का, इस्रायलने शोधला ‘सर्वात मोठा बोगदा’; वाचा सविस्तर..)

सविस्तर माहितीनुसार, माध येथील भाजीपाला व्यापाऱ्याचे पती, पत्नी आणि दोन लहान मुले रिक्षात प्रवास करत होते. जुन्नर तालुक्यातील डिंगोर गावाजवळील अंजीराची बाग येथे ही घटना घडली. गणेश मस्करे (३० वर्षे), कोमल मस्करे (२५ वर्षे), हर्षद मस्करे (४ वर्षे) आणि काव्या मस्करे (४ वर्षे) अशी मृतांची (Ahmednagar-Kalyan Highway Accident) नावे आहेत. अन्य मृतांची नावे अद्याप समोर आली नाही.

(हेही वाचा – Dawood Ibrahim : भारताच्या अजून एका शत्रूचा अंत होणार ? अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग)

पुढील तपास सुरू

अपघाताची (Ahmednagar-Kalyan Highway Accident) माहिती मिळताच स्थानिकांसह ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरु आहे. दरम्यान, आठ जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ओतूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू (Ahmednagar-Kalyan Highway Accident) झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.