शिंडलर्स लिस्ट हा अप्रतिम आणि क्रांतिकारी चित्रपट दिग्दर्शित करणारे Steven Spielberg

162
शिंडलर्स लिस्ट हा अप्रतिम आणि क्रांतिकारी चित्रपट दिग्दर्शित करणारे Steven Spielberg
शिंडलर्स लिस्ट हा अप्रतिम आणि क्रांतिकारी चित्रपट दिग्दर्शित करणारे Steven Spielberg

स्टीव्हन अॅलन स्पीलबर्ग (Steven Spielberg) हे एक अमेरिकन चित्रपट निर्माते,  दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे. २००६ मध्ये प्रीमियर मासिकाने त्यांना चित्रपट उद्योगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून घोषित केले. टाईम मॅगझिनने त्यांचा शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला आहे. विसाव्या शतकाच्या शेवटी, लाइफने त्यांना त्यांच्या पिढीतील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हटले आहे.

वयाच्या १४ व्या वर्षी नऊ मिनिटांचा चित्रपट बनवला

स्पीलबर्ग (Steven Spielberg) यांचा जन्म १८ डिसेंबर १९४६ रोजी सिनसिनाटी, ओहियो येथे झाला. त्यांची आई, लेह कॉन्सर्ट पियानोवादक होती आणि त्यांचे वडील, अरनॉल्ड स्पीलबर्ग इलेक्ट्रिकल अभियंता होते. स्टीव्हन स्पीलबर्ग (Steven Spielberg) यांनी १९५८ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी ‘द लॉस्टगन फाईट’ नावाचा नऊ मिनिटांचा चित्रपट बनवला होता. यानंतर आणखी काही लघुपटही तयार झाले. हे चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या कथांवर आधारित होते. ते जवळपासच्या पार्क्स आणि रेस्टॉरंटमध्ये शूट करायचे. पुढे वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी फायरलाईट हा साय-फाय साहसी चित्रपट बनवला. त्याचे बजेट ५०० डॉलर एवढे होते. चित्रपटासाठी त्यांनी मित्रांची मदत घेतली. विशेष म्हणजे त्यांच्या घराच्या गॅरेजमध्ये त्याचे शूटिंग झाले. जवळपास ५०० लोकांनी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटातून त्यांना एक डॉलरचा नफा झाला. पुढे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

(हेही वाचा-Maratha Reservation: दारू पिऊन किडन्या गेल्या; भुजबळांची जारांगेंवर जहाल शब्दात टीका )

एकूण संपत्ती $३.१ अब्ज 

२० व्या वर्षीच त्यांना दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. त्यांनी ’नाइट गॅलरी’ चे पायलट एपिसोड शूट केले. मग त्यांनी दिग्दर्शनासह लेखनालाही सुरुवात केली. तेव्हा त्यांना चांगले यश मिळाले. त्यांनी जॉस नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला आणि हा चित्रपट चांगलाच चालला. त्यांनी ५० हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केलेत. जॉस, ईटी द एक्स्ट्रा टेरेस्ट्रीअल, जुरासिक पार्क, शिंडलर्स लिस्ट, सेविंग प्राइवेट रेयान असे सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. शिंडलर्स लिस्ट या चित्रपटाला तर ७ ऑस्कर मिळाले आहेत. फोर्ब्स मासिकानुसार स्पीलबर्ग यांची एकूण संपत्ती $३.१ अब्ज आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.