Sharad Pawar : शरद पवार अंतिम डाव काय टाकणार?

बारामती लोकसभा मतदार संघात पवारकन्या सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा, अशी थेट लढत होणार असून यात शरद पवार यांनी सुप्रिया यांच्या विजयासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

142
Baramati LS Constituency : मतदान आकडेवारीचा कौल सुनेत्रा पवार यांच्या बाजूने
  • सुजित महामुलकर

गेल्या ६० वर्षाहून अधिक काळ सक्रिय राजकारणात राहिलेले ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सगळ्यात महत्वाच्या लढाईला सामोरे जात आहेत. रविवारी ५ मे ला संध्याकाळी ६ वाजता प्रचार बंद झाला आणि पवारांची तब्बेत बिघडली. उद्या मंगळवारी, ७ मे ला बारामती लोकसभा मतदार संघात मतदान होणार असून विजयासाठी शरद पवार कोणता अंतिम डाव टाकतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Sharad Pawar)

संपूर्ण ताकद पणाला

बारामती लोकसभा मतदार संघात पवारकन्या सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा, अशी थेट लढत होणार असून यात शरद पवार यांनी सुप्रिया यांच्या विजयासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. यापूर्वी कोणत्याही निवडणुकीत प्रचारासाठी उतरले नव्हते इतके जवळचे नातेवाईक सुप्रिया यांच्या निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरवले. (Sharad Pawar)

नातेवाईकांची भावनिक साद

अगदी सुप्रिया यांच्या आई प्रतिभा पवार, सुप्रिया यांची कन्या रेवती सुळे, अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार, अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र, दूसरा पुतण्या आमदार रोहित पवार, अशा सगळ्यांनी भावनिक साद घालत बारामतीकरांना सुप्रिया यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. (Sharad Pawar)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : महायुती राज्यात किती जागा जिंकणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा)

रोहित भाषणात रडले, अजितदादांनी उघडे पाडले

काल (रविवारी ५ मे, २०२४) रोहित पवार यांनी तर भर सभेत भाषण करताना डोळ्यातून पाणी काढत शरद पवारांची एक आठवण सांगितली. ‘राष्ट्रवादी पक्ष योग्य माणसाच्या हातात दिल्याशिवाय आपण डोळे मिटणार नाही,’ असे शरद पवार म्हणाले असे सांगून रोहित भाषण करता करता रडले. अजित पवार यांनी काही तासांतच रोहित यांना उघडे पाडले आणि अशा ‘नौटंकी’ बारामतीकर भुलणार नाहीत, असे स्पष्ट केले. (Sharad Pawar)

पवारांची तब्बेत बिघडली

रविवारी ५ मे २०२४ ला पवार यांची तब्बेत बिघडली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारच्या सगळ्या राजकीय सभा रद्द केल्या. शरद पवार यांनी उद्या होणाऱ्या मतदानाची प्रचंड धास्ती घेतली असून मतदानाला काही तास शिल्लक राहिले असताना पवार कोणता अंतिम डाव टाकतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Sharad Pawar)

.. तर राजकीय जीवनाच्या अस्ताची सुरुवात

सुप्रिया यांचा पराभव झाला तर हा शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा हादरा असेल. अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याला नवी कलाटणी देणारा तो दिवस असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निर्विवाद हक्क अजित पवार यांना मिळेल तर शरद पवार यांच्या ६०-६२ वर्षाच्या राजकीय जीवनाच्या अस्ताची सुरुवात असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Sharad Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.