IPL 2024, KKR vs MI : कोलकाता संघाचा वानखेडे मैदानावरील विजयांचा दुष्काळ संपला 

IPL 2024, KKR vs MI : कोलकाता संघाने १६९ धावातं यशस्वी रक्षण करत मुंबईचा २४ धावांनी पराभव केला

92
IPL 2024, KKR vs MI : कोलकाता संघाचा वानखेडे मैदानावरील विजयांचा दुष्काळ संपला 
IPL 2024, KKR vs MI : कोलकाता संघाचा वानखेडे मैदानावरील विजयांचा दुष्काळ संपला 
  • ऋजुता लुकतुके

२०१२ साली कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium)वर (IPL 2024, KKR vs MI) सामना जिंकला होता. पण, या विजयाची आठवण तरीही संघासाठी कडूच होती. कारण, सामन्यानंतर संघाचे मालक शाहरुख खानचं (Shah Rukh Khan) तिथल्या सुरक्षा रक्षकांशी भांडण झालं. शाहरुख त्या रक्षकावर हल्ला करून गेला होता. त्यानंतर शाहरुखवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने पाच वर्षांची बंदी घातली. तीन वर्षांनंतर ती बंदी हटवण्यात आली. (IPL 2024, KKR vs MI)

हा प्रसंग तर कठीण होताच. पण, त्याशिवाय कोलकाता संघाला आणखी एक दु:ख होतं. त्या घटनेनंतर कोलकाता संघाने मुंबई विरुद्ध वानखेडेवर (Wankhede Stadium) विजयच मिळवला नव्हता. पण, ही बोचही आता जाणार आहे. कारण, या हंगामात कोलकाताने वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) मुंबई विरुद्ध २४ धावांनी विजय मिळवला. पहिली फलंदाजी करत १६९ धावांत गुंडाळल्या गेलेल्या कोलकाताने या धावसंख्येचं रक्षण करत हा विजय मिळवला हे सगळ्यात विशेष. (IPL 2024, KKR vs MI)

(हेही वाचा- Marathwada Water Crisis: मराठवाड्यात पाणीस्थिती भीषण, चार धरणांमध्ये शून्य ट्क्के पाणीसाठा)

मिचेल स्टार्कने ३३ धावांत ४ बळी मिळवले. गेराल्ड कोत्झीएचा त्रिफळा उडवत शेवटचा बळीही त्यानेच मिळवला. त्यानंतर मैदानावर कोलकाता खेळाडूंचा जल्लोष सुरू झाला. (IPL 2024, KKR vs MI)

मुंबईला विजयासाठी १७० धावा हव्या होत्या. पण, ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत राहिले. इशान (Ishan) (१३), रोहित (Rohit) (११) आणि नमन धीर (Naman Dhir) (११) हे आघाडीचे खेळाडू झटपट बाद झाले. त्यानंतर फॉर्ममध्ये असलेला तिलक वर्माही (Tilak Verma) ४ धावांवर तंबूत परतला. सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) ३५ चेंडूंत ५५ धावा करताना सामन्यात थोडीफार रंगत निर्माण केली होती. पण, आंद्रे रसेलने (Andre Russell) एका अप्रतिम चेंडूवर सुर्यकुमारचा (Suryakumar) बळी मिळवला. मुंबईचं उर्वरित आव्हानही संपलं. त्यानंतर टीम डेव्हिडने (Tim David) २५ धावा करत फक्त डाव लांबवला. (IPL 2024, KKR vs MI)

(हेही वाचा- Raj Thackeray: मनसेने कधीच कोणाशी युती का केली नाही? राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं)

त्या आधी कोलकाताचा डावही असाच अडखळता होता. पहिले पाच बळी ५७ धावांतच तंबूत परतले होते. पण, त्यानंतर वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) ५२ चेंडूंत ७० धावा करत पडझड थांबवली. मनोज पांडेनं (Manoj Pandey) ४२ धावा करत कोलकाताला निदान १६९ धावांवर पोहोचवलं. मुंबईकडून जसप्रीत बुमराने (Jaspreet Bumrah) १८ धावांत ३ बळी घेतले. (IPL 2024, KKR vs MI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.