Israel-Hamas Conflict: हमासला मोठा धक्का, इस्रायलने शोधला ‘सर्वात मोठा बोगदा’; वाचा सविस्तर..

बोगदा हवेशीर आणि विजेने सुसज्ज आहे आणि काही ठिकाणी तो ५० मीटर खोलवर जातो.

284
Israel-Hamas Conflict: हमासला मोठा धक्का, इस्रायलने शोधला 'सर्वात मोठा बोगदा'; वाचा सविस्तर..
Israel-Hamas Conflict: हमासला मोठा धक्का, इस्रायलने शोधला 'सर्वात मोठा बोगदा'; वाचा सविस्तर..

हमासच्या विरोधात कारवाईत गुंतलेल्या इस्रायली (Israel-Hamas Conflict) सैन्याला एका बोगद्याचा शोध लागला आहे. या बोगद्याच्या रूपाने इस्त्रायली सैन्याला मिळालेले हे मोठे यशच आहे. इस्रायली लष्कराने याला हमासच्या नेटवर्कचा ‘सर्वात मोठा’ बोगदा म्हटले आहे. या चार किमीच्या बोगद्यातून वाहनांची ये-जाही शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या बोगद्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याचा दावाही लष्कराने केला आहे, ज्याचा वापर हल्ल्यासाठी केला जाणार होता.

बोगद्याचे प्रवेशद्वार तटबंदीच्या इरेझ क्रॉसिंगपासून आणि जवळच्या इस्रायली लष्करी तळापासून केवळ काही किलोमीटर अंतरावर आहे. या बोगद्याविषयी इस्रायली लष्कराकडून देण्यात आलेली माहिती अशी की, हा बोगदा ४ किलोमीटरहून अधिक लांब असून त्याची रुंदी इतकी आहे की, त्यातून वाहने आरामात जाऊ शकतात. लष्कराच्या म्हणण्यानुसार, हा बोगदा गाझामधील एका मोठ्या बोगद्याच्या नेटवर्कशी जोडलेला आहे, जिथून ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या तयारीसाठी वाहने, अतिरेकी आणि शस्त्रे पुरवली गेली असावीत, अशी शक्यता इस्रायली सैन्याने व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Article 370 : देशाला लागलेला कलम ३७० रूपी कर्करोग काढून टाकणे आवश्यकच होते ! )

“सध्या हा गाझामधील सर्वात मोठा बोगदा आहे,” असे मुख्य लष्करी प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी शुक्रवारी बोगद्याच्या प्रवेशद्वाराला भेट दिल्यानंतर पत्रकारांना सांगितले. मात्र, हा बोगदा ऑक्टोबर २०१६ मध्ये वापरण्यात आला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लष्कराचे प्रवक्ते मेजर नीर दिनार यांनी सांगितले की, इस्रायली सुरक्षा दलांना ७ ऑक्टोबरपूर्वी बोगद्याची माहिती नव्हती, कारण इस्रायलच्या सीमा रक्षकांना फक्त इस्रायलमध्ये प्रवेश करणारे बोगदे सापडले. शुक्रवारी बोगद्याला भेट दिलेल्या दिनारने सांगितले की, तो गाझामध्ये सापडलेल्या इतर बोगद्यांपेक्षा दुप्पट उंच आणि तीनपट रुंद आहे.

पुढे ते म्हणाले की बोगदा हवेशीर आणि विजेने सुसज्ज आहे आणि काही ठिकाणी तो ५० मीटर खोलवर जातो. ते म्हणाले की, हे स्पष्ट आहे की बोगद्याचे बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी लाखो डॉलर्स, तसेच मोठ्या प्रमाणात इंधन आणि कामगारांची आवश्यकता असेल. यादरम्यान हगारी यांनी हमास नेता याह्या सिनवार याचा भाऊ मोहम्मद सिनवार यांचा व्हिडिओही दाखवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो वाहनात बसून बोगद्याच्या आत गाडी चालवत आहे. इस्रायली सुरक्षा दल हमासवर कारवाई करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.