Article 370 : देशाला लागलेला कलम ३७० रूपी कर्करोग काढून टाकणे आवश्यकच होते !

187
Article 370 : देशाला लागलेला कलम ३७० रूपी कर्करोग काढून टाकणे आवश्यकच होते !
Article 370 : देशाला लागलेला कलम ३७० रूपी कर्करोग काढून टाकणे आवश्यकच होते !

अशोक पंडित

कलम ३७०च्या (Article 370) बेड्या हातात पडल्या होत्या. जम्मू-काश्मीर जणू अटकेत असल्यासारखेच होते. जम्मू-काश्मीर, लडाखच्या समस्येमुळे संपूर्ण देश त्रस्त होता. कलम ३७० चा वापर करून तेथील सर्व स्थानिक राजकीय पक्ष जसे की, पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स किंवा काँग्रेसनेही या कलमाचा वापर करून देश लुटला. हे पैसे आपल्या देशाचे होते. तुम्ही-मी भरलेल्या कराचे होते. कॉंग्रेसने कोट्यवधी रुपये खाल्ले.

कलम ३७० च्या नावाखाली देश ब्लॅकमेल

सर्व राजकीय पक्षांनी कलम ३७० च्या नावाखाली देशाला ब्लॅकमेल केले. ३७० मुळे जम्मू-काश्मीरमधील महिलांना योग्य अधिकार मिळाले नाहीत. तेथील अनुसूचित जाती-जमातींना त्यांचे अधिकार मिळाले नाहीत. त्यामुळे महिला, अनुसूचित जाती-जमातींतील समाजबांधवांचा विकास झाला नाही. तेथील जनतेला स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यांना आता त्यांचे अधिकार मिळतील.

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदामागे कलम ३७०

९० च्या दशकात काश्मिरी हिंदूंचा नरसंहार घडला. वंशविच्छेद घडला. त्यालाही कलम ३७०च कारणीभूत होते. आम्हा काश्मिरी हिंदूंना आमच्या मातृभूमीतून पलायन करावे लागले. त्यामागेही कलम ३७०च होते.

(हेही वाचा-Nitesh Rane: धारावीच्या नव्हे तर मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, नीतेश राणे यांचा ठाकरे गटावर घणाघात)

काश्मीरमधील हत्या, बलात्कार यांमागे कलम ३७०

काश्मीरमध्ये इस्लामिक कट्टरतावाद प्रचंड फोफावला. तेथील आतंकवादालाही कलम ३७०च जबाबदार आहे. तेथे ज्या ज्या हत्या, बलात्कार झाले आहेत, त्या सर्वांना कलम ३७० कारणीभूत होते. काश्मिरी हिंदूंनाही इस्लामी आतंकवादाचे भीषण परिणाम भोगावे लागले. त्यामुळे ३७० हटवणे आवश्यकच होते. हा एकप्रकारे देशाला लागलेला कर्करोगच होता. त्यामुळे बाधित भाग काढून टाकणे खूप महत्त्वाचे होते. मोदी सरकारने तो काढून टाकला आणि ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने त्यावर मोहोर उमटवली.

देशाच्या विकासावरही परिणाम

वास्तविक ते कलम तात्पुरतेच होते. ते कायमस्वरूपी नव्हते. कॉंग्रेसने त्यांच्या राजकारणासाठी हे कलम कायम ठेवले होते. या तात्पुरत्या कलमाला कॉंग्रेसने कायमस्वरूपी मान्यता दिल्यामुळे देशाच्या विकासावरही परिणाम झाला. जे अब्जावधी रुपये ३७० (Article 370) मुळे जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेली स्थिती सांभाळण्यासाठी वापरले गेले, तेच देशाच्या विकासासाठी वापरता आले असते.

समाजाचा आत्मविश्वास वाढला

आता त्याच पैशांचा वापर करून जम्मू-काश्मीरचा विकास करता आला असता. गेल्या काही वर्षांत तेथे मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत महिलांना आरक्षण दिल्यामुळे समाजाचा आत्मविश्वास वाढला आहे. काश्मिरी हिंदू ज्यांनी कलम ३७० आणि त्यामुळे फोफावलेला दहशतवाद यांमुळे पुष्कळ भोगले आहे, त्यांच्यासाठी मोदी सरकारने हे मोठे योगदान दिले आहे.

आता जम्मू-काश्मीरमधील स्थिती सामान्य होऊ लागली आहे. देशभर विखुरलेले काश्मिरी हिंदू त्यांच्या मातृभूमीवर परतू शकतात, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने कलम ३७० आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यासाठी उचललेली पावले आशादायी आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.