Shubman Gill : २०२३ साल मनासारखं गेलं नाही, असं शुभमन गिल का म्हणतो?

स्टार सलामीवीर शुभमन गिलने २०२३ वर्षासाठी केलेले संकल्प लिहिलेली एक नोट इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली आहे 

165
Shubman Gill : २०२३ साल मनासारखं गेलं नाही, असं शुभमन गिल का म्हणतो?
Shubman Gill : २०२३ साल मनासारखं गेलं नाही, असं शुभमन गिल का म्हणतो?

ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) नवीन वर्षाची सुरुवात करताना गेल्यावर्षी स्वत:साठी केलेले संकल्प आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध केले आहेत. शुभमनने हाताने लिहिलेली ही नोट आहे. आणि ती प्रसिद्ध करताना शुभमन म्हणतो, ‘मागचं वर्ष खूप साऱ्या घडामोडींनी भरलेलं, नवीन अनुभव देणारं पण, पाहिजे तसा शेवट न झालेलं होतं.’

अर्थातच, शुभमनला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाबद्दल वाईट वाटतं. हस्तलिखित नोट बरोबरच शुभमनने वर्षभरातील संस्मरणीय क्षणांचे फोटोही एकत्र करून टाकले आहेत. यात भारतासाठी केलेली शतकं, विश्वचषकातील जिव्हारी लागणारा पराभव, पालकांबरोबरचे फोटो, गुजराज टायटन्सची जर्सी स्वीकारतानाचा फोटो, असे फोटो आहेत.

या कोलाजच्या सुरुवातीलाच आहे ती हस्तलिखित नोट,

 

View this post on Instagram

 

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

‘बरोबर एका वर्षापूर्वी मी स्वत:साठी हे लिहून ठेवलं होतं. २०२३ वर्ष आता संपत आलं आहे. या वर्षाने काही चांगल्या आठवणी दिल्या. काही अनुभव आणि धडे दिले. वर्षाचा शेवट काही मनासारखा झाला नाही. पण, निदान आम्ही आमच्या उद्दिष्टाच्या जवळ पोहोचलो. निकराचा प्रयत्न केला. आता नवीन वर्षात नवीन आव्हानं आणि नवे अनुभव असणार आहेत. नवीन संधीही असतील. तुम्हा सगळ्यांना तुम्ही जे कराल, त्यात आनंद, समाधान मिळेल, अशी मी आशा करतो.’

हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सकडे गेल्यामुळे शुभमन गिलकडे २०१४ च्या आयपीएल हंगामात गुजरात संघाच्या नेतृत्वाची संधी चालून आली आहे. आणि २०२३ मध्ये शुभमनची फलंदाजीतील कामगिरीही अव्वलच होती. ४७ धावांच्या सरासरीने त्याने १,३७४ धावा केल्या त्या ३ शतकं आणि ८ अर्धशतकांच्या सहाय्याने.

एकदिवसीय विश्वचषकात शुभमनने ९ सामन्यांमध्ये ३५४ धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध ९२ धावा ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.