भारतीय इतिहासातील पहिला युथ आयकॉन Lokmanya Tilak

81
भारतीय इतिहासातील पहिला युथ आयकॉन Lokmanya Tilak

“The youth of a nation are the trustees of posterity. They must cultivate a fearless mind and a spirit of tireless self-discovery.”

Lokmanya Tilak          म्हणजे आजचे तरुण हे देशाच्या भावी पिढीचे विश्वस्त आहेत त्यांनी अतिशय निडरतेने आपल्या स्वत:चा अविश्रांत शोध घेतला पाहिजे. हे शब्द आहेत योगी अरविंदांचे. कुठल्याही देशाची तरुणाई ही त्या देशाची सुप्त शक्ती आहे. अगदी शिवाजी महाराजांचा इतिहास जरी बघितला तरी आपल्याला हे दिसेल की, हा इतिहास महाराज आणि त्यांच्या तरुण मावळ्यांनीच घडवला आहे. जगातील घडलेल्या सर्वच क्रांतीकारी घटना या त्या त्या भागातील तरुणांच्या सहभागाशिवाय घडूच शकल्या नसत्या. भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहासदेखील हा तरुणांच्या आत्मसमर्पण, त्यागाचा त्यांनी दाखवलेल्या निडरतेचाच इतिहास आहे. भारतातील तरुणाईचे खरे मर्म ओळखून त्यांना राष्ट्रकार्यात जोडून घेणे हे मात्र फारच कमी पुढाऱ्यांना जमले. या मोजक्या नावांमध्ये सर्वात अग्रगण्य नाव आहे ते लोकमान्य टिळकांचे. लोकमान्य हे नि:संशय तरुणांचे नेते होते. तरुणांची शक्ती जर राष्ट्रकार्यात वापरली गेली तर नक्कीच स्वातंत्र्याच्या चळवळीचा पाया मजबूत होईल याची त्यांना जाणीव होती. आज टिळक पुण्यतिथीनिमित्त टिळकांच्या तरुणाईबद्दलच्या कार्याचा आढावा घेण्याचा या लेखाचा प्रयत्न… (Lokmanya Tilak)

(हेही वाचा – US Iran War : अमेरिका, इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोंदींनी घेतला देशाच्या सुरक्षिततेचा आढावा)

सुरुवात करु कोल्हापूरच्या शिवाजी महाराज चौथे यांच्या प्रकरणापासून. कोल्हापूर संस्थानात तेथील दिवाण माधवराव बर्वे यांच्या सहाय्याने इंग्रजांनी संस्थानात अनागोंदी माजवण्यास सुरुवात केली होती. शिवाजी महाराज चौथे हे संस्थान चालवण्यास पूर्णपणे अकार्यक्षम असून त्यांच्या जागी कारभाऱ्यांच्या हातात कारभार दिला पाहिजे असा बनाव इंग्रजांनी रचायला सुरुवात केली होती. यावेळी गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक या दोघांनीही केसरी आणि मराठा मधून याविरोधात अग्रलेखांमधून टीकेची झोडच उठवली होती. याचवेळी केसरी आणि मराठा या पुण्यातील वर्तमानपत्रांकडे काही गोपनीय पत्रे आली. त्यात असा दावा करण्यात आला होता की महाराजांना विष देण्याचा कट रचला जातो आहे. याचबरोबरीने त्यांना वेडे ठरवून त्यांना गादीवरुन हटवण्याचा प्रयत्न होतो आहे. यामध्ये याचा सुत्रधार म्हणून दिवाण माधवराव बर्वे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या पत्रांच्या आधारे केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांनी या प्रकरणात थेट माधवराव बर्वे यांच्यावर ठपका ठेवला. याविरोधात बर्व्यांनी आगरकर आणि टिळक या दोघांवरही खटला भरला. या खटल्यात टिळक आणि आगरकर या दोघांनीही १०१ दिवसांची शिक्षा झाली. या खटल्यामुळे आगरकर आणि टिळकांचे नाव झाले. देशासाठी झटणारे तरुण म्हणून त्यांची ओळख तयार झाली. न्या. रानडे यांनीही दोघांबद्दल म्हटले होते की या दोन तरुणांची तळमळ अतिशय प्रामाणिक आहे. यांना अपयश जरी आले तरी देशाचे पाऊल पुढेच पडेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तरुणांनी पुढे येऊन थेट ब्रिटीश सरकारला अंगावर घेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे टिळक प्रामुख्याने तरुणांचे नेते म्हणून पुढे यायला लागले होते. (Lokmanya Tilak)

(हेही वाचा – US Iran War : अमेरिका, इराण संघर्षात फेब्रुवारीपासून १६ भारतीयांचा मृत्यू; संसदेत माहिती)

यापुढे आपण एकदम १८९४ या वर्षात येऊ. याकाळात हळुहळू राष्ट्रीय सभेचे कार्य जोम धरु लागले होते. याच काळात तरुण नवसुशिक्षितांचा सहभाग या चळवळीत वाढावा यासाठी काहीतरी मोठे पाऊल उचलले पाहिजे असे टिळकांना वाटत होते. त्यातून मुंबई प्रांतात वाढणारे हिंदू – मुस्लिम दंगे यांनाही उत्तर म्हणून हिंदूंना संघटित करण्याची गरज टिळकांना वाटत होती. यातूनच गणेशोत्सवाची आणि शिवजयंती उत्सवाची कल्पना समोर आली. यामुळे १८९३ साली टिळकांनी तोपर्यंत चालणाऱ्या छोटेखानी रुप असणाऱ्या गणेशोत्सवाला राष्ट्रीयतत्त्वाचे मोठे वळण दिले. केसरीवाड्यात यावर्षी झालेल्या गणेशोत्सवात पहिल्यांदा टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. या गणेशोत्सवात दहा दिवसांत विशेषत: राष्ट्रीय भावनांना उत्तेजन देणारे कार्यक्रम होत असते. नाटके, पोवाड्यांचे कार्यक्रम, किर्तने, स्वदेशीच्या विचारांच्या प्रसाराचे कार्यक्रम यांची रेलचेल असे. दरवर्षी मोहरम आणि तत्सम उत्सवांच्या प्रसंगी मुसलमान लोक ताबुतांच्या मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत. याला जोरदार उत्तर म्हणून गणेशोत्सवात मोठ्या मोठ्या मिरवणुका निघायला लागल्या. हिंदूंना आत्मभान येण्यासाठी टिळकांची ही खेळी अतिशय लागू पडली. तीच गोष्ट शिवजयंती उत्सवाची. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे मराठी जनांचे श्रद्धास्थान. त्यांच्या विचारांचा देखील तरुणांच्या ऐक्यासाठी वापर करण्याचे टिळकांनी ठरवले. १८९५ यावर्षी थेट रायगडावरच टिळकांनी पहिला शिवजयंती उत्सव साजरा केला. या दोन्ही उत्सवांना उत्तेजन म्हणून टिळकांनी राष्ट्रीय महोत्सवांची आवश्यकता आणि राष्ट्रीय महोत्सवांच्या वेळी सुशिक्षितांनी काय केले पाहिजे असे अग्रलेख लिहिले. यांची लोकप्रियता इतकी झाली की पुढे राजद्रोहाच्या खटल्यावेळी शिवजयंती उत्सव हा त्यातला प्रमुख आधार बनला होता. (Lokmanya Tilak)

(हेही वाचा – मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एकही कीटक नाही म्हणणं हास्यास्पद! Highcourt चा संतप्त सवाल, अधिकाऱ्यांना पुन्हा तपासणी अहवाल सादर करण्याचे निर्देश)

या पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिळकांचा तरुण क्रांतीकारकांवर पडलेला प्रभाव. चाफेकर बंधूंवर देखील टिळकांचा प्रभाव होता. टिळकांच्या हिंदुत्त्वादी राष्ट्रवादी लिखाणाचा त्यांच्यावर प्रभाव होता. अनेक क्रांतीकारी विचारांच्या तरुणांना उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती सुरु करणाऱ्या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यावर देखील टिळकांचाच प्रभाव होता. १९०५ यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या देशातील पहिल्या विदेशी कपड्यांच्या होळीमागे टिळकांचीच प्रेरणा होती. टिळक हे अनेक तरुण क्रांतीकारकांचे देखील प्रेरणास्थान होते. लोकमान्य टिळकांनी देशातील तरुणांना स्वातंत्र्यासाठी चळवळ करण्यासाठी प्रोत्साहन दिले, नुसतेच प्रोत्साहन देऊन ते थांबले नाहीत तर ते स्वत:ही चळवळीत पुढे राहून त्यांनी त्यांचे नेतृत्त्वदेखील केले. यामुळे स्वातंत्र्यचळवळीतील तरुणांचे पहिले आयकॉन हे टिळकच होते. आजही आमच्यासारख्या तरुणांनादेखील तेच प्रेरणास्थान वाटत आहेत यातच टिळकांच्या विचारांची ताकद आहे. आज टिळक पुण्यतिथीनिमित्त त्यांना सादर प्रणाम. (Lokmanya Tilak)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.