-
ऋजुता लुकतुके
US Iran War अमेरिका-इराण संघर्षामुळे पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाचा फटका भारतीय नागरिकांनाही बसला आहे. फेब्रुवारी २०२६ पासून पश्चिम आशियातील संघर्ष आणि संबंधित घटनांमध्ये १६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १० जण हे भारतीय खलाशी होते, अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली. (US Iran War)
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या भारतीयांमध्ये ओमानमधील आठ, संयुक्त अरब अमिरातीतील चार, कुवेतमधील दोन, तर इराण आणि सौदी अरेबियातील प्रत्येकी एका भारतीयाचा समावेश आहे. याशिवाय ७५ भारतीय नागरिक जखमी झाले असल्याची माहितीही सरकारने दिली. (US Iran War)
(हेही वाचा – Koyna Dam मध्ये अचानक वाढला विसर्ग; कृष्णा नदीकाठी राहणाऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा)
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे विशेषतः व्यावसायिक जहाजवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी आणि पर्शियन आखात परिसरातील सुरक्षा धोक्यांमुळे भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेबाबत सरकारची चिंता वाढली आहे. (US Iran War)
सरकारने संसदेत सांगितले की, भारतीय दूतावास, परराष्ट्र मंत्रालय आणि नौदल संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. संकटग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांना आवश्यक मदत, माहिती आणि संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या आहेत. (US Iran War)
(हेही वाचा – फिटनेस सर्टिफिकेट घोटाळ्यावर Transport Department चा मोठा दणका; अनेक आरटीओ कार्यालये चौकशीच्या रडारवर)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली होती. या बैठकीत भारतीय खलाशांची सुरक्षा, जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे, ऊर्जा सुरक्षा आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. (US Iran War)
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने काही जहाजमालक आणि शिपिंग कंपन्यांना होर्मुझ मार्गावर भारतीय खलाशांची नव्याने नियुक्ती टाळण्याच्या सूचना दिल्याचेही वृत्त आहे. तसेच भारतीय नौदलाने या परिसरात गस्त वाढवली असून आवश्यकतेनुसार मदत आणि संरक्षण देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. (US Iran War)
(हेही वाचा – FIFA Friendly, Ind vs Bra : भारताला ब्राझीलबरोबर मैत्रीपूर्ण सामना खेळण्याची संधी; कधी, कुठे होणार हा सामना)
पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक तेलपुरवठा, समुद्री व्यापार आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलत असल्याचे संसदेत स्पष्ट करण्यात आले. (US Iran War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

