मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एकही कीटक नाही म्हणणं हास्यास्पद! Highcourt चा संतप्त सवाल, अधिकाऱ्यांना पुन्हा तपासणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

83
मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एकही कीटक नाही म्हणणं हास्यास्पद! Highcourt चा संतप्त सवाल, अधिकाऱ्यांना पुन्हा तपासणी अहवाल सादर करण्याचे निर्देश
मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एकही कीटक नाही म्हणणं हास्यास्पद! Highcourt चा संतप्त सवाल, अधिकाऱ्यांना पुन्हा तपासणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

Highcourt  मंत्रालयातील कँटीनमध्ये (उपाहारगृह) ‘साधा एकही कीटक आढळला नसून ते ९८ टक्के स्वच्छ आहे’, असा दावा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांची आणि एफडीएची चांगलीच कानउघाडणी केली आहे. “मंत्रालयातल्या एवढ्या मोठ्या उपाहारगृहात साधा एकही कीटक नाही म्हणणे हास्यास्पद आहे. पंचतारांकित हॉटेलमध्येही माशी किंवा झुरळ आढळतात, मग मंत्रालयातले कँटीन एवढे साफ आहे हे पटते का?” असा संतप्त सवाल न्यायालयाने केला. तसेच, न्यायालयाच्या चार वकिलांच्या पथकासह एफडीएच्या अधिकाऱ्यांना आज दुपारपर्यंतच मंत्रालयाच्या कँटीनची पुन्हा तपासणी करून व व्हिडिओग्राफीसह दुपारी ३ वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या या कडक भूमिकेचा दणका बसताच मंत्रालयातील कँटीनमध्ये किचनपासून ते टेबलपर्यंत तातडीने साफसफाई आणि स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे.

न्यायालयात नेमके काय घडले?

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) काही खासगी हॉटेल्सवर कारवाई केल्यानंतर हॉटेलचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायालयाने मागील सुनावणीत दिलेल्या आदेशानुसार एफडीएने सरकारी आस्थापनांची तपासणी करून आज अहवाल सादर केला. यामध्ये “मंत्रालयातील कँटीन ९८ टक्के स्वच्छ असून तिथे एकही कीटक आढळला नाही”, असा दावा सरकारी वकिलांनी केला.

हेही वाचा – अमरावतीतील पूरस्थितीवर DCM Sunetra Pawar यांचे लक्ष; प्रशासनाला दिले तातडीचे आदेश

या दाव्यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, “मंत्रालयातल्या एवढ्या मोठ्या कँटीनमध्ये एकही कीटक न आढळणे हे हास्यास्पद आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही झुरळ किंवा माशी आढळून येतेच. हा दावा तुम्हाला तरी पटतो का?”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.