अमरावतीतील पूरस्थितीवर DCM Sunetra Pawar यांचे लक्ष; प्रशासनाला दिले तातडीचे आदेश

87
अमरावतीतील पूरस्थितीवर DCM Sunetra Pawar यांचे लक्ष; प्रशासनाला दिले तातडीचे आदेश
  • प्रतिनिधी

DCM Sunetra Pawar           अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शुक्रवारी सविस्तर माहिती घेतली. जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असल्याने काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (DCM Sunetra Pawar)

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे प्रभावित झालेल्या भागांतील परिस्थिती, सुरू असलेले बचाव आणि मदतकार्य तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. (DCM Sunetra Pawar)

(हेही वाचा – भाजपचे प्रवक्ते Shehzad Poonawala यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत? एक्सवरील बायो बदलल्यानं चर्चा; काय लिहिलंय?)

यावेळी पूरग्रस्त नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचवावी, अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी आणि कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही, यासाठी प्रशासनाने अत्यंत दक्षतेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. (DCM Sunetra Pawar)

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून पूरग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (DCM Sunetra Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.