दहशतवादी संघटनांना पोसणारा ‘हलाल’!

157

आपल्या देशात कुठल्याही वस्तू विकताना ‘आयएसआय’ मार्क बंधनकारक असतो. वस्तुंची गुणवत्ता आणि ग्राहकाची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने आखून दिलेला हा नियम आहे. मुस्लिम राष्ट्रांनीही हलाल नावाचा मार्क तयार केला आहे. हा मार्क नसल्यास ५२ मुस्लिम राष्ट्रांत कोणतीही वस्तू विकता येत नाही. त्यामुळे या देशांत व्यवसाय करायचा झाल्यास हलाल प्रमाणपत्र वा शिक्का बंधनकारक आहे. वरकरणी हा त्या देशांचा नियम असला, तरी त्यामागचा छुपा अजेंडा भयानक आहे. हलाल प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी संबंधित देशांनी काही संस्था आणि संकेतस्थळांना परवाने दिले आहेत. त्यांच्याकडे अर्ज दाखल केला आणि शुल्क भरले की हे हलाल प्रमाणपत्र दिले जाते. हलाल मार्क मिळाला की, व्यवसाय एकदम ५२ देशांत वाढतो, या आशेपोटी बहुतांश व्यापारी, उद्योजक हलाल प्रमाणपत्र विकत घेतात. परंतु, हलालमधून जो पैसा मिळतो, तो दहशतवादी संघटनांना पुरवला जातो.

जगभरात आज दहशतवादी कृत्ये वाढत चालली आहेत. केवळ बॉम्बस्फोट म्हणजे दहशतवाद नव्हे. दहशतवादाचे अनेक छुपे मार्ग अलिकडच्या काळात तयार करण्यात आले आहेत. दुकाने, हॉटेल्सना हिंदूंची नावे देऊन दिशाभूल करणे, लव्ह जिहाद हाही त्यातलाच एक मार्ग. या आणि अशा अनेक मार्गांनी संपूर्ण जगाचे इस्लामीकरण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दारूल-उल-हरबचे दारूल-उल-इस्लाम करण्याचे जगातल्या मुसलमानांचे एकमेव ध्येय आहे. त्यासाठी जे अनेक मार्ग अवलंबले जात आहेत, त्यातला हलाल हा एक प्रमुख मार्ग आहे. हलालच्या माध्यमातून जगतिक पातळीवर समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. अमेरिका, युरोपियन राष्ट्रांशी व्यवहार करताना त्यांचे शुल्कही भरावे लागते, परंतु ते देश यातून आलेल्या पैशांचा दहशतवादासाठी वापर करीत नाहीत. त्यामुळे हलालवर योग्यवेळी बंदी घातली नाही, तर येत्या काही वर्षांत जगासमोर एक महाभयंकर संकट उभे ठाकणार आहे.

…तर मोठ्या संकटाला निमंत्रण

हलाल मागचा छुपा अजेंडा आता आपल्याला कळू लागला आहे. पण कळूनही शांत बसलो, तर आपण मोठ्या संकटाला निमंत्रण देत आहोत. त्यामुळे सर्व उद्योगपतींना माझी एक नम्र विनंती आहे की, या ५२ देशांमध्ये आपला माल विकला गेला नाही, तरी चालेल, पण हलालवर बंदी घातली पाहिजे. कारण, हलाल खरेदीसाठी आपण जो पैसा देत आहोत, त्यातून आपल्यावरच दहशतवादी हल्ले केले जाणार आहेत. त्यामुळे हलाल परिषदेला, हलालला वेळीच आळा घातला पाहिजे.

(लेखक ज्येष्ठ अभिनेते आणि शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.