वयाच्या दुसर्‍या वर्षीच नेमबाजीची झलक दाखवणारे नेमबाज Gagan Narang

68
वयाच्या दुसर्‍या वर्षीच नेमबाजीची झलक दाखवणारे नेमबाज Gagan Narang

गगन नारंग (Gagan Narang) हे एक भारतीय क्रीडा नेमबाज आहेत. त्यांनी ३० जुलै २०१२ रोजी लंडनमधील २०१२ समर ऑलिंपिकमध्ये (2012 Summer Olympics) पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल (Air rifle) स्पर्धेत ७०१.१ एवढे अंतिम गुण मिळवून कांस्यपदक जिंकले. विशेष म्हणजे पद्म पुरस्कार समिती २०२३ चे सदस्य देखील होते. ६ मे १९८३ रोजी चेन्नईतील पंजाबी हिंदू अरोरा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमसेन नारंग आणि आईचे नाव अमरजीत असे आहे.

त्यांच्या नेमबाजीची सुरुवात तेव्ह अझाली जेव्हा १९९७ मध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना एअर पिस्तूल आणून दिले होते. बेगमपेट येथील त्यांच्या घराच्या मागील अंगणात त्यांनी नेमबाजी शिकायला सुरुवात केली. २ वर्षांचे असतानाच त्यांनी खेळण्याच्या पिस्तुलीने फुगा फोडला तेव्हाच खर्‍या अर्थाने ही सुरुवात झाली होती, अशी आठवण त्यांच्या वडिलांनी सांगून ठेवली आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता प्रतीक्षा मतदानाची)

त्यांनी २६ ऑक्टोबर २००३ रोजी हैदराबाद येथे आफ्रो एशियन गेम्स (Afro Asian Games), २००३ मध्ये पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २००६ च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी एअर रायफल सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतर एप्रिल २०१० च्या स्पर्धेत विजयही खेचून आणला. हॅनोव्हर, जर्मनी येथे झालेल्या प्री-ऑलिम्पिक स्पर्धेत (Germany Pre-Olympic Games) त्यांनी जागतिक विक्रम मोडला, त्यांना एअर रायफलचा स्कोर होता, ७०४.३. गगन नारंग यांनी २००६च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ४ सुवर्णपदके जिंकली होती.

२००८ मध्ये चीनमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर नारंग २००८ च्या ISSF विश्वचषक फायनलसाठी पात्र ठरले. त्यांनी पात्रता फेरीत अचूक ६०० स्कोर केला होता. अंतिम फेरीत १०३.५ गुण मिळवून एकूण ७०३.५ गुण मिळवून विश्वविक्रम बनवला. नारंगने ग्लासगो येथील २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन आणि ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये अनुक्रमे १ रौप्य पदक आणि १ कांस्य पदक पटकावले. (Gagan Narang)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.