दिव्यांग मुलांना आधार देणारे S. Ramakrishnan

64
दिव्यांग मुलांना आधार देणारे S. Ramakrishnan

एस. रामकृष्णन (S. Ramakrishnan) हे तामिळनाडूतील अमर सेवा संगमचे (Amar Seva Sangh) संस्थापकीय अध्यक्ष आहेत. दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसन क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. रामकृष्णन यांना २०२० साठी भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले. ६ मे १९५४ रोजी सालेम येथे त्यांचा जन्म झाला. त्यांची तंजावर आणि आयकुडी येथे शालेय शिक्षण घेतले. १९७० मध्ये ते कोईम्बतूरच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग कोर्स करु लागले आणि १९७५ रोजी ते बेंगळुरू येथे आयोजित नौदल अधिकाऱ्यांच्या निवड मुलाखतीला गेले.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधानांनी अयोध्येत श्रीरामासमोर घातला साष्टांग दंडवत नंतर केला रोड शो)

शारीरिक चाचणीदरम्यान ते पडले आणि त्यांच्या मानेला आणि मणक्याला दुखापत झाली ज्यामुळे त्यांच्या मानेखालील संवेदना आणि स्नायूंची शक्ती पूर्णपणे नष्ट झाली, तसेच मूत्राशय आणि आतड्यांवरील नियंत्रण बिघडले. सुरुवातीला त्यांना बंगळुरूच्या एअरफोर्स कमांड हॉस्पिटलमध्ये (Bangalore Air Force Hospital) सुमारे तीन महिने ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना पुण्यातील खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

रामकृष्णन यांनी १० महिने पुण्यात रिहॅबिलिटेशनचा कोर्स केला. येथेच त्यांना त्यांचे ऑर्थोपेडिक चिकित्सक आणि मार्गदर्शक एअर मार्शल डॉ. अमरजित सिंग चहल भेटले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन रामकृष्णन यांनी सहा वर्षांनंतर गुरुंच्य अनावाने अमर सेवा संगम ही संस्था स्थापन केली. १९८१ मध्ये रामकृष्णन यांनी आयकुडी येथे दिव्यांग मुलांसाठी शाळा सुरू केली. या संस्थेसाठी रामकृष्णन यांच्या पालकांनी जमीन दान केली.

(हेही वाचा – जी भाषा पाकिस्तान करतेय तिच भाषा काँग्रेस का करतेय? Ashish Shelar यांचा घणाघात)

मस्कुलर डिस्ट्रॉफी असलेले ऑडिटर शंकर रमन १९९२ मध्ये संगममध्ये सामील झाले. ते संगमचे मानद सचिव आहेत. पोलिओ प्रतिबंध आणि पुनर्वसनाशी संबंधित काही उपक्रमांपासून या कामाची सुरुवात झाली आणि आता ३० एकर जमीन या संस्थेच्या नावावर आहे. या संस्थेतर्फे दिव्यांगांसाठी अनेक कार्ये केली जातात .

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.