5G यूजर्सना मिळणार हे 5 मोठे फायदे; जाणून घ्या सविस्तर

100

भारतात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्या 5G सेवा काही शहरांमध्ये सुरु करत आहेत. त्यामुळे 5G सेवा पूर्णपणे सुरु झाल्यानंतर युजर्सना कोणते फायदे मिळतील? याबद्दल जाणून घेऊया.

  • दरम्यान, 5G सेवा पूर्णपणे सर्वत्र सुरु होताच, तुम्हाला हाय स्पीड इंटरनेटचा अनुभव मिळू लागेल. 5G ही एक अशी सेवा आहे. ज्याची प्रत्येकजण वाट पाहत आहे. कारण हाय स्पीड इंटरनेट ही आज लोकांची गरज बनली आहे आणि 5G सेवा आल्यानंतर लोकांना हायस्पीड इंटरनेट वापरण्याचा अनुभव मिळेल.
  • 5G सेवेच्या आगमनानंतर, आता काॅलिंग पूर्वीपेक्षा चांगल्या क्वालिटीसह होईल आणि यादरम्यान कोणताही व्यत्यय येणार नाही. कारण ब-याच वेळा 4G नेटवर्कमध्ये काॅल करताना समस्या असायची, परंतु 5G सेवेमुळे अशी कोणतीही समस्या होणार नाही.

( हेही वाचा: धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यावर सुप्रिया सुळेंची शायराना अंदाजात प्रतिक्रिया, म्हणाल्या… )

  • 5G सेवेद्वारे तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट मिळेल, इतकेच नाही तर तुम्हाला एक चांगला डाउनलोडिंग स्पीड देखील मिळेल, जो या सेवेचा एक मोठा भाग आहे.
  • 5G इंटरनेटमुळे युजर्स हेवी फाइल्स लवकर डाउनलोड करु शकतील. काॅल ड्राॅपची समस्या 4G नेटवर्कमध्ये सामान्य आहे आणि अनेक वर्षांपासून युजर्सना याचा त्रास होत आहे. 5G नेटवर्क आल्यानंतर आता युजर्सची या समस्येपासून सूटका होणार आहे आणि काॅलिंग दरम्यान कोणतेही कारण नसताना अचानक काॅल कट होणार नाही, ज्यामुळे या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
  • 4G सेवेतील एक प्रमुख समस्या ही होती की, अनेक भागांमध्ये नेटवर्क पूर्णपणे गायब झाले होते आणि ब-याच भागात ते चांगले होते, परंतु 5G सेवा सुरु केल्यानंतर, तुम्हाला सर्वत्र नेटवर्कचे सर्वोत्तम कव्हरेज मिळेल, ज्यामुळे काॅलिंग करणे आणि इंटरनेटचा वापर अधिक सुलभ होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.