जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासांत ५ वेळा भूकंपाचे हादरे

173
जम्मू-काश्मिरात २४ तासांत ५ वेळा भूकंपाचे हादरे
जम्मू-काश्मिरात २४ तासांत ५ वेळा भूकंपाचे हादरे

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये २४ तासांत सौम्य तीव्रतेचे ५ भूकंपाचे धक्के जाणवल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ४.५ तीव्रतेचा भूकंप सर्वात मोठा होता.

यापूर्वी शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये दुपारी २ वाजून ३ मिनिटांनी ३.० तीव्रतेच्या भूकंपाचा पहिला हादरा जाणवला. त्यानंतर कटरा येथे रविवारी, १९ जूनला भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.१ इतकी होती. रविवारी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास पुन्हा भूकंप झाला. कटरा येथे ११ किमी खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी लडाखच्या लेहमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ईशान्य लेहमधील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंप दुपारी २.१६ वाजता झाला.

(हेही वाचा – Heat Wave : उत्तर प्रदेशात उष्णतेचा हाहाकार; तीन दिवसांत उष्माघाताचे ५४ बळी)

मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यापूर्वी शनिवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी २.०३ वाजता झालेल्या ३.० तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डोंगराळ रामबन जिल्ह्यात होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.