Heat Wave : उत्तर प्रदेशात उष्णतेचा हाहाकार; तीन दिवसांत उष्माघाताचे ५४ बळी

सध्या उत्तर प्रदेशचे ४०-४३ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे.

91
Heat Wave : उत्तर प्रदेशात उष्णतेचा हाहाकार; तीन दिवसांत उष्माघाताचे ५४ बळी

राज्यासह देशामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे (Heat Wave) नागरिक हैराण झाले असतानाच बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबला आहे. त्यामुळे जून महिन्याची १५ तारीख उलटून गेली तरीही सर्वांना अजून पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होतांना पाहायला मिळत आहे.

अशातच उत्तर प्रदेशमध्ये उष्माघाताचा (Heat Wave) ५४ बळी गेले आहेत. गेल्या तीन दिवसांतील ही आकडेवारी असून तब्बल ४०० जण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत वाढत्या तापामानामुळे (Heat Wave) ५४ जणांचा मृत्यू झाला असून ४०० जणांवर उपचार सुरू आहेत. मृत्यूची कारणे वेगवेगळी असली तरीही तीव्र उष्माघात हे मागचे महत्वाचे कारण असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच तीव्र उष्णतेमुळे रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. ताप, आणि श्वसनाचा त्रास ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. सध्या उत्तर प्रदेशचे ४०-४३ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे.

(हेही वाचा – यावर्षीही पीओपीच्या गणेशमुर्ती; मराठी माणसाच्या रोजगारावर बंदी न आणण्याचे आशिष शेलार यांचे आवाहन)

उष्माघातामुळे (Heat Wave) १५ जून रोजी २३ जणांचा मृत्यू झाला होत, १६ जून रोजी २० जणांचा मृत्यू झाला, तर १७ जून रोजी ११ जण दगवल्याची माहिती बलिया जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक एस.के. यादव यांनी दिली.

आझमगड सर्कलचे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. बी. पी तिवारी यांनी सांगितले की, “या आजारामागचे कारण शोधण्याकरता लखनौहून एक पथक येत आहे. वातावरणात प्रचंड उष्मा (Heat Wave) किंवा गारवा असतो तेव्हा श्वसनाचे विकार होतात. याचा सर्वाधिक धोका मधुमेह आणि उच्चरक्तदाब रुग्णांना असतो. त्यामुळे वातावरणात अधिक उष्णता निर्माण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.