यावर्षीही पीओपीच्या गणेशमुर्ती; मराठी माणसाच्या रोजगारावर बंदी न आणण्याचे आशिष शेलार यांचे आवाहन

यावर्षी देखील पिओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी मिळायलाच हवी, मुंबई महापालिकेने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मांडली.

105
यावर्षीही पीओपीच्या गणेशमुर्ती; मराठी माणसाच्या रोजगारावर बंदी न आणण्याचे आशिष शेलार यांचे आवाहन

कोटींची उलाढाल असलेल्या आणि मराठी तरुणांना रोजगार देणाऱ्या गणेशमूर्ती कारखान्यांवर बंदी आणून मराठी माणसाचा रोजगार बुडवू नका, असे आवाहन भाजप आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. यावर्षी देखील पिओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी मिळायलाच हवी, मुंबई महापालिकेने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मांडली.

लालबाग-परळ गणेशमूर्तीकार संघातर्फे रविवार १८ जून रोजी परेल येथे महाराष्ट्रातील मुर्तीकारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड.आशिष शेलार उपस्थितत होते.

यावेळी ते म्हणाले की, “मुर्तीकार ही एक मोठी इंडस्ट्री आहे, रोजगार निर्माण करणारे राज्यातलं ते एक मोठं साधन आहे. पूर्ण जगभरामध्ये महाराष्ट्रात निर्माण केलेल्या या मूर्त्यांच्या देवाण-घेवाणीमधून ७० ते ८० हजार कोटीपर्यंतची उलाढाल होते.

(हेही वाचा – सेनेच्या वर्धापन दिनापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार)

एवढं मोठं काम असलेली ही इंडस्ट्री एका निर्णयाकडे बोट दाखवून जर बंद करण्याचा प्रयत्न कोण करीत असेल तर आमचा त्याला विरोध आहे. पीओपीच्या मुर्तीवर बंदी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो जनहिताचा नाही. महाराष्ट्र हिताचा नाही, देश हिताचाही नाही. शास्त्रज्ञांनी पीओपीच्या मूर्त्यासुद्धा शास्त्रीय दृष्ट्या विरघळू शकतात, पर्यावरण घातक न ठरता सुद्धा त्यांचे विसर्जन होऊ शकते, या गोष्टी समोर आणल्या आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने सरकारने विचार करावा.

विशेषतः मुंबई महानगरपालिकेने जे परिपत्रक काढले आहे त्यानुसार, चार फुटापर्यंतच्या खालील मुर्ती ह्या शाडू मातीच्याच असाव्यात, हे आम्हाला बिलकुल मान्य नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः पालिका आयुक्त, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. या निर्णयावर काही न्यायालयीन आदेश असले तरी आपण त्यावर निर्णय घेऊ, पण हा मराठी माणसाचा रोजगार कुठेच बंद होता कामा नये, यासाठीच भूमिका घेऊन आम्ही चाललो आहोत, असे आमदार अँड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

जी मुंबई महापालिका गेली पंचवीस वर्षे मुंबईतील ३,५०० दशलक्ष लिटर सांडपाणी रोज समुद्रात कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सोडत आहे त्या मुंबई महापालिकेला फक्त गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते हे बोलण्याचा अधिकार आहे का? ८० हजार कोटींच्या ठेवी असताना का सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु केले नाहीत? असा सवाल यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.