तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा; Amol Kolhe यांचे अजित पवारांना खुले आव्हान

शेतकरी धोरणाचे विरोधी उमेदवार कौतुक करतात. मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणार भाव, दुधाचे दर, कांदा निर्यात, टोमॅटो याबद्दल ते बोलले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही कांदा निर्यातीबद्दल बोलले नाहीत. दहा वर्षात ते पुण्यात अनेकदा आले, मात्र एकदाही शिवजन्मभूमीत आले नाहीत, असे डॉ. कोल्हे म्हणाले.

143

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला कसली मर्दुमकी दाखवता, मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही, अशा कडक शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी जाहीर सभेत आव्हान दिले.

शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर येथे जेष्ठ नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार ऍड. राम कांडगे, दिलीप ढमढेरे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे, बाबा परदेशी, अनंतराव चौगुले, सुनिल मेहेर, बाजीराव ढोले, शरद चोधरी, बाळासाहेब बाणखेले, अल्लूभाई ईनामदार, अनिल तांबे, दिपक औटी, बाबू पाटे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, किशोर दांगट, शरद लेंढे, सुरज वाजगे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हे  (Amol Kolhe) यांना पाडून दाखवतो, असे म्हटल्यानंतर आजच्या जाहीर सभेत डॉ. कोल्हेंनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला. अजित पवार जेव्हा तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला पाडून दाखवतो, असे म्हणता तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडला मी काय चूक केली. शेतकऱ्यांचे, बिबट्यांचे, जनतेचे प्रश्न मांडले ही चूक केली? की स्वाभिमान गहाण ठेवला नाही ही चूक केली?

(हेही वाचा Fake Video Case : अमित शहांच्या बदनामी प्रकरणाशी जिग्नेश मेवाणींचा संबंध? दोन जणांना अटक )

तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा ना मर्दुमकी.  शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला, बिबट्याच्या त्रासापासून मुक्त करायला मर्दुमकी दाखवा. मात्र, पाडापाडी करण्याची भाषा आणि दमदाटी करणं सोडा. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही, हेही ठणकावून सांगितलं. अमोल कोल्हे लढायला तयार नव्हता, मग अचानक कसा तयार झाला, असे असं अजित पवार सर्वत्र म्हणतात. मात्र दादा ही विचारांची लढाई आहे, स्वाभिमानाची लढाई आहे. म्हणून ताठ मानेने जगायचं अन लढायचं ठरवलं, असेही कोल्हे  (Amol Kolhe) म्हणाले,

दरम्यान, आपल्या भाषणात विरोधी उमेदवारांचाही कोल्हेंनी चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुण्यात आले होते. या सभेत मोदी यायच्या आधी अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना फक्त साडे तीन मिनिटं देण्यात आली. यात ही त्यांनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात, यावर भाष्य केलं. शेतकरी धोरणाचे विरोधी उमेदवार कौतुक करतात. मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणार भाव, दुधाचे दर, कांदा निर्यात, टोमॅटो याबद्दल ते बोलले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही कांदा निर्यातीबद्दल बोलले नाहीत. दहा वर्षात ते पुण्यात अनेकदा आले, मात्र एकदाही शिवजन्मभूमीत आले नाहीत. त्यांना इथं येऊन नतमस्तक व्हावंसं वाटलं नाही.

होय, आमचे साहेब आमचा आत्मा आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सभेत शरद पवारांना भटकती आत्मा म्हणत टीका केली. हो, आमचे साहेब आत्मा आहेत. ते जनतेचा आत्मा आहेत. वाजपेयींच्या सत्ताकाळात भूकंपग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हाचं आत्मा पुढं आला होता., अस सांगत मोदींनी केलेल्या टिकेला उत्तर दिलं. हा आत्मा शेतकऱ्यांच्या बांधावर, तरुणांना न्याय देण्यासाठी भटकतो. याला आम्ही पवित्र मानतो. आम्ही आमच्या आत्म्याला जपतो आणि कायम जपणार आहोत. आमचा आत्मा पक्ष, घरं फोडत नाही.

(हेही वाचा Love Jihad : अश्लिल व्हिडीओ बनवत नराधम हाशिम धर्मांतरासाठी टाकत होता दबाव )

कोणाच्या कंपनीच भले केले?

आपल्या भाषणात डॉ. कोल्हे  (Amol Kolhe) यांनी, काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीचे भल होतंय हे कळतय. असे म्हणत विरोधी उमेदवाराला लक्ष केलं.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.