Mumbai High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २२ वेळा समुद्रात उसळणार, ४.५ मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा!

यंदाच्या पावसाळ्यादरम्यान मोठ्या भरतीच्या अनुषंगाने महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे यानिमित्ताने करण्यात आले आहे.

510
Mumbai High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २२ वेळा समुद्रात उसळणार, ४.५ मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा!

यंदाच्या पावसाळ्यादरम्यान म्हणजेच जून २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा असण्याचे दिवस आणि वेळ यांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार यंदाच्या पावसाळ्यात एकूण २२ दिवस उंच लाटा उसळणार आहेत. यापैकी ७ दिवस हे जून महिन्यातील, ४ दिवस हे जुलै महिन्यातील, ५ दिवस हे ऑगस्ट महिन्यातील तर सप्टेंबर महिन्यातील ६ दिवस आहेत. यापैकी सर्वाधिक उंच लाटा या २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून ०३ मिनिटांनी उसळणार असून या लाटांची उंची ४.८४ मीटर इतकी असेल. (Mumbai High Tide)

यंदाच्या पावसाळ्यादरम्यान मोठ्या भरतीच्या अनुषंगाने महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे यानिमित्ताने करण्यात आले आहे. (Mumbai High Tide)

(हेही वाचा – Ola Cabs : ओला कॅब्जच्या प्रमुखांचा राजीनामा, १० टक्के कर्मचारी कपातही करणार)

पावसाळ्यातील अधिक उंचीच्या लाटांचा तपशिल खालीलप्रमाणेः-

जून – २०२४

क्रम वार दिनांक वेळ भरतीची उंची

१ बुधवार ०५.०६.२०२४ सकाळी ११.१७ वा. ४.६१ मीटर.

२ गुरुवार ०६.०६.२०२४ दुपारी १२.०५ वा. ४.६९ मीटर.

३ शुक्रवार ०७.०६.२०२४ दुपारी १२.५० वा. ४.६७ मीटर.

४ शनिवार ०८.०६.२०२४ दुपारी ०१.३४ वा. ४.५८ मीटर.

५ रविवार २३.०६.२०२४ दुपारी ०१.०९ वा. ४.५१ मीटर.

६ सोमवार २४.०६.२०२४ दुपारी ०१.५३ वा. ४.५४ मीटर.

७ मंगळवार २५.०६.२०२४ दुपारी ०२.३६ वा. ४.५३ मीटर. (Mumbai High Tide)

जुलै – २०२४

क्रम वार दिनांक वेळ भरतीची उंची

१ सोमवार २२.०७.२०२४ दुपारी १२.५० वा. ४.५९ मीटर.

२ मंगळवार २३.०७.२०२४ दुपारी ०१.२९ वा. ४.६९ मीटर.

३ बुधवार २४.०७.२०२४ दुपारी ०२.११ वा. ४.७२ मीटर.

४ गुरुवार २५.०७.२०२४ दुपारी ०२.५१ वा. ४.६४ मीटर. (Mumbai High Tide)

ऑगस्ट – २०२४

क्रम वार दिनांक वेळ भरतीची उंची

१ सोमवार १९.०८.२०२४ सकाळी ११.४५ वा. ४.५१ मीटर.

२ मंगळवार २०.०८.२०२४ दुपारी १२.२२ वा. ४.७० मीटर.

३ बुधवार २१.०८.२०२४ दुपारी १२.५७ वा. ४.८१ मीटर.

४ गुरुवार २२.०८.२०२४ दुपारी ०१.३५ वा. ४.८० मीटर.

५ शुक्रवार २३.०८.२०२४ दुपारी ०२.१५ वा. ४.६५ मीटर. (Mumbai High Tide)

सप्टेंबर – २०२४

क्रम वार दिनांक वेळ भरतीची उंची

१ मंगळवार १७.०९.२०२४ सकाळी ११.१४ वा. ४.५४ मीटर.

२ बुधवार १८.०९.२०२४ सकाळी ११.५० वा. ४.७२ मीटर.

३ गुरुवार १९.०९.२०२४ मध्यरात्री ००.१९ वा. ४.६९ मीटर, दुपारी १२.२४ वा. ४.७८ मीटर.

४ शुक्रवार २०.०९.२०२४ मध्यरात्री ०१.०३ वा. ४.८४ मीटर, दुपारी ०१.०२ वा. ४.७० मीटर.

५ शनिवार २१.०९.२०२४ मध्यरात्री ०१.४७ वा. ४.८२ मीटर, दुपारी ०१.४२ वा. ४.५० मीटर.

६ रविवार २२.०९.२०२४ मध्यरात्री ०२.३३ वा. ४.६४ मीटर. (Mumbai High Tide)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.