स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या रक्तदान शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने आयोजित केलेले हे १९वे रक्तदान शिबीर होते. 

256
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या रक्तदान शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि सहायता फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १८ जून रोजी वीर सावरकर स्मारक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सह-कार्यवाह आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त शैलेंद्र चिखलकर तसेच सहायता फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वानंद कामत आणि सहकारी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ८० रक्तदात्यांनी नोंद केली. त्यापैकी ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयाच्या मदतीने हे रक्तदान शिबीर संपन्न झाले.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून मुंबई महानगरपाल‍िका प्रशासनाची थोपटली पाठ)

१९वे रक्तदान शिबीर

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण कळत – नकळत अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. रुग्णांना रक्ताची खूप गरज असते, अनेकदा रक्तसाठा अपुरा पडत असल्याने समस्या निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे इतर अनेक उपक्रमांसोबतच प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने आयोजित केलेले हे १९वे रक्तदान शिबीर होते.

रक्तदान करण्याचे फायदे

रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. रक्तदानामुळे शरीराला अनेक फायदे होतात. उदाहरणार्थ रक्तदान केल्याने बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार होण्यास मदत होते. नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते. नियमित रक्तदान केल्याने शरीरातील रक्ताभिसरण क्रियेला मदत होते.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.