जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत आपण महाविकास आघाडीमध्ये राहू – संजय राऊत

119
जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत आपण महाविकास आघाडीमध्ये राहू - संजय राऊत
जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत आपण महाविकास आघाडीमध्ये राहू - संजय राऊत

शिवसेनेच्या ५७व्या वर्धापनदिनानिमित्ताने ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या शिबिराचे वरळीतील एनएससीआय आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक उपस्थित राहिले होते. या शिबिरात बोलताना खासदार संजय राऊत यांनी भावी मुख्यमंत्र्यांच्या चर्चेवरून महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला. तसेच जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत आपण महाविकास आघाडीमध्ये राहू, असे प्रतिपादन संजय राऊतांनी केले.

नक्की संजय राऊत काय म्हणाले?

कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय राऊत म्हणाले की, ‘सध्या महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलंय उद्धवजी. पाहावं तिकडे भावी मुख्यमंत्री, पाहावं तिकडे भावी मुख्यमंत्री. आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत, राहू जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत. हे काय आमच्या इच्छेवर नाहीये. हे राजकारण आहे. पण आपण पाहतोय भावी मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री. अरे बाबांनो अजूनही विद्यमान मुख्यमंत्री समोरही बसले आहेत.’

पुढे राऊत म्हणाले की, ‘आम्ही स्वबळावर विधानसभेवर भगवा फडकवणार आहे. आम्ही स्वबळावर सत्ता आणणार आहोत. हा आमचा पक्ष आहे आणि आमची तशी इच्छा आहे. ही अतिरेकी इच्छा नाही. ज्याचं घर फोडलं. ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं. आम्ही बोलतो, कारण आमचं जळालं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.