Mumbai Metro One : ‘मुंबई मेट्रो वन’कडे ४६१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत; आता आली मुंबई महापालिकेला जाग

मुंबईतील विविध मालमत्ताधारकांकडून करवसुली करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

616
Mumbai Metro One : ‘मुंबई मेट्रो वन’कडे ४६१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत; आता आली मुंबई महापालिकेला जाग
वेसावे (वर्सोवा) ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवा देणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षापर्यंतचा ४६१ कोटी १७ लाख ६१५ रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबई मेट्रो वनच्या व्यवस्थापनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही त्यांनी अद्यापही करभरणा केलेला नाही. (Mumbai Metro One)
मुंबईतील विविध मालमत्ताधारकांकडून करवसुली करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा करुन कठोर दंडात्मक कार्यवाही टाळावी आणि करभरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वारंवार केले जात आहे. करभरणा न करणाऱ्या बड्या मालमत्ताधारकांना नोटीसही बजावण्यात येत आहे. (Mumbai Metro One)
वेसावे ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवा देणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे मुंबईतील चार विभागांमधील एकूण २८ मालमत्तांचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा कर थकीत आहे. त्यापैकी के (पश्चिम) विभागातील एकूण १८ मालमत्तांसाठी ३११ कोटी ७७ लाख ८५ हजार ६६८ रुपये; के (पूर्व) विभागातील ६ मालमत्तांसाठी ११६ कोटी २९ लाख १ हजार ५१ रुपये; एल विभागातील २ मालमत्तांसाठी १९ कोटी ४ लाख ६२९ रुपये आणि एन विभागातील २ मालमत्तांसाठी १४ कोटी ६ लाख १३ हजार २६७ रुपये इतका कर थकीत आहे. (Mumbai Metro One)
के (पश्चिम) आणि एल विभागातील मालमत्तांसंदर्भात मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडला  महानगरपालिकेच्या वतीने नोटीस जारी करत २१ दिवसांच्या आत मालमत्ता करभरणा करण्यास सांगितले आहे. तर, के (पूर्व) आणि एन विभागाकडून नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय, मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या चार विभागातील २८ मालमत्तांसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १८ कोटी २९ लाख ३६ हजार ११ रुपये एवढा कर आकारण्यात आला आहे. (Mumbai Metro One)
दरम्यान, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन  महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. (Mumbai Metro One)
अशाप्रकारे आहे थकीत मालमत्ता कराची रक्कम
के (पश्चिम) विभाग :  एकूण १८ मालमत्तांसाठी ३११ कोटी ७७ लाख ८५ हजार ६६८ रुपये.
के (पूर्व) विभाग : एकूण ६ मालमत्तांसाठी ११६ कोटी २९ लाख १ हजार ५१ रुपये.
एल विभाग : एकूण २ मालमत्तांसाठी १९ कोटी ४ लाख ६२९ रुपये.
एन विभाग : एकूण २ मालमत्तांसाठी १४ कोटी ६ लाख १३ हजार २६७ रुपये इतका कर थकीत आहे. (Mumbai Metro One)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.