विखे पाटलांच्या पिढ्या समजून घ्यायच्या असतील तर… ; Dr. Sujay Vikhe Patil यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

जनता १३ तारखेला उत्तर देईल, निवडणुकीत निम्मे काम जेष्ठ नेत्यांनी करून टाकले आहे. असा टोला ही विखे पाटलांनी लगावला.

110
विखे पाटलांच्या पिढ्या समजून घ्यायचे असतील तर… ; Dr. Sujay Vikhe Patil यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

(Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीनच्या प्रचार सभा चालू झाल्या असून. या प्रचारात सत्ताधारी – विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडल्या जात आहेत. ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील (Padmashri Vitthalrao Vikhe Patil) यांनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला, मात्र त्यांच्या पुढच्या पिढीने काय केले?’ असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad  Pawar) यांनी राहुरीतील सभेत टीका केली होती. यावर विखे-पाटलांच्या तिसऱ्या पिढीतील सदस्य, खासदार डॉ. सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) यांनी उत्तर दिले. ‘पुढच्या पिढीने काय केले ?’ हे समजून घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना पाच तास लागतील. असा कडक शब्दात टोला डॉ. विखे यांनी लगावला आहे. (Dr. Sujay Vikhe Patil) 

(हेही वाचा – उबाठा गटाचे ५ ते ६ आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात ; Uday Samant यांचा दावा  )

स्टार प्रचारक व भाजपाचे ज्येष्ठ नेते मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Minister Radhakrishna Vikhe-Patil) नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा गाडा ओढताना दिसत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके (Mahavikas Aaghadi Nilesh Lanke) यांच्यात लोकसभा २०२४ ची लढत होणार आहे. पवार आणि विखे-पाटील यांच्यात जुनाच राजकीय संघर्ष आहे. दरम्यान, राहुरीच्या सभेत डॉ. विखे पाटील यांच्या परिवारांवर शरद पवारांनी टीका केली होती.  (Dr. Sujay Vikhe Patil)

(हेही वाचा –Crime : चिकन तंदुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या )

डॉ. विखे-पाटील यांनी पारनेर तालुक्यातील एका मेळाव्यात बोलताना पवार यांना उत्तर दिले. डॉ. विखे-पाटील म्हणाले की, या निवडणूकीत निम्मे काम ज्येष्ठ नेत्यांनी करून टाकले आहे. आता उरलेलं काम जनता १३ मे रोजी करून दाखवेल. तसेच पारनेरच्या जनतेला २०१९ मध्ये केलेली चूक सुधारण्याची संधी आहे. असे विधान ही डॉ. विखे-पाटील यांनी केले. मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा लेखाजोगा मतदारांपुढे आहे. जे केले तेच आपण सांगतो. या मतदारसंघातील युवकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. लोकसभेची ही निवडणूक देशाचे उज्वल भवितव्य घडवणारी आहे. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान होतील आणि नगरचा खासदारही महायुतीचाच असेल, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले. (Dr. Sujay Vikhe Patil)

  हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.