नाशकात ठाकरे गट-शिंदे गट आमनेसामने; CM Eknath Shinde यांच्या रोड शो वेळी दोन्ही गटाकडून घोषणाबाजी

185

चौथ्या टप्प्यात मुंबईसह महामुंबईसह नाशिक येथे  लोकसभा निवडणूक होणार आहे. अशा वेळी गुरुवार, १६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाशिक रोड शो केला. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यानंतर दोन्ही गटांकडून घोषणाबाजी सुरु झाली.

(हेही वाचा भाषणाच्या वेळी नेत्यांनी संयत भाषा वापरावी; Election Commission च्या सूचना)

मुख्यमंत्र्यांच्या अॅक्शनचा व्हिडिओ व्हायरल 

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यापर्यंत राज्यात ही निवडणूक शरद पावर आणि अजित पवार यांच्या भोवती फिरत होती, मात्र पाचव्या टप्प्यात आता ही निवडणूक ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात लढली जाऊ लागली आहे. जेव्हा मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या रोड शो करत असताना त्यांचा रथ ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर आला तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देणे सुरु केले, त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार रथातून धनुष्यबाणातून बाण सोडत असल्याची ऍक्शन करून त्याला प्रत्युत्तर दिले. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नाशिकला आले आहेत. यावेळी मोठ्या संख्येने प्रचार रॅली काढण्यात आली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.