Naxalite : मतदानाच्या तीन दिवस आधी नक्षलवादी आणि पोलिस यांच्यात चकमक; नक्षल्यांचा कमांडर ठार

143
पहिल्या टप्प्यासाठी मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे, त्याच्या ३ दिवस आधी छत्तीसगड येथे धक्कादायक घटना घडली. इथे कांकेरमध्ये नक्षलवादी (Naxalite) आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. यात तीन जवान जखमी झाले. मात्र नक्षलवाद्यांचा कमांडर ठार झाला आहे.

सहा अनुसूचित जमातींसाठी राखीव

मिळालेल्या माहितीनुसार, छोटे बेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माड भागात चकमक सुरू असून, या चकमकीत नक्षलवादी (Naxalite) कमांडर शंकर राव याचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत कमीत कमी 18 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच, मोठ्या संख्येने ऑटोमॅटिक रायफलदेखील जप्त करण्यात आल्या आहेत. जखमी जवानांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात निवडणुका कांकेरमध्ये 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. छत्तीसगडमधील रायपूर आणि जगदलपूर दरम्यान असलेल्या कांकेर लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 8 जागांचा समावेश आहे, त्यापैकी सहा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या विधानसभा जागांमध्ये गुंडेरदेही, संजरी बालोड, सिहावा (ST), दोंडी लोहारा (ST), अंतागड (ST), भानुप्रतापपूर (ST), कांकेर (ST) आणि केशकल (ST) यांचा समावेश आहे. मूळचा बस्तर जिल्ह्याचा भाग असलेला कांकेर 1998 मध्ये वेगळा जिल्हा बनला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.