महाराष्ट्र हे अतृप्त आत्म्याचे शिकार झालेले राज्य ; PM Narendra Modi यांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका

173
महाराष्ट्र हे भटक्या आत्म्याचे शिकार झालेले राज्य ; PM Narendra Modi यांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका

महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता जहरी टीका केली आहे. गरीबी कधी हटवणार असं विचारलं तरा राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणतात खटाखट असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ सभेत हे वक्तव्य केलं आहे. पुणे तिथे काय उणे. या भूमीने महात्मा फुले, जोतिबा फुले यांच्यासारखे समाजसुधारक दिले आहेत. असं विधान मोदींनी सभेत केले. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Murder : श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती; निजामने केली पुनमची निघृण हत्या)

महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर

पंतप्रधान मोदी यावेळी भाषणात म्हणाले की, काही भटके आत्मे आहेत. स्त्रीची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती भटकत राहते. ती स्वतःही समाधानी नाही आणि इतरांनाही अस्थिर करत राहते. महाराष्ट्रातील एका नेत्याने हा खेळ ४५ वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात. एवढेच नाही तर, स्वतःच्या वागणुकीमुळे कुटुंबातही अस्थिरता निर्माण होते. या अतृप्त आत्म्याने १९९५च्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि २०१९ मध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता, असं म्हणत मोदींनी पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली. पुण्यातील रेसकोर्स येथे पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Mumbai South Constituency : अरविंद सावंत यांच्या मालमत्तेत ८५ टक्क्यांची वाढ)

येत्या काळात पुणे बनेल ऑटोमोबाईल हबचे केंद्र  

२०१४ आधी भारत मोबाईल आयात करायचा. मोदी सरकार आल्यानंतर भारत आता मोबाईल निर्यात करतो. मेड इन इंडिया चिपही जगभरात निर्यात केली जाणार आहे. देशाला तरुण पिढीवर विश्वास आहे. भारताच्या तंत्रज्ञानावर विश्वास आहे. पुण्यातील तरुण बुद्धीमान आहे, येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री, चंद्रकांत पाटील, मनसे नेते अमित ठाकरे, सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, रूपाली चाकणकर, खा.मेधा कुलकर्णी, डॉ नीलम गोऱ्हे, प्रकाश जावडेकर उपस्थित होते.  (PM Narendra Modi)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.