Oxidised Jewellery Set :अद्वितीय आकर्षण निर्माण करणारी ऑक्साईड दागिने परिधान करा आणि दिसा एकदम हटके!

172

ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jeweller) सध्याच्या तरुणांमध्ये हा एक आकर्षक ट्रेंड झाला आहे. या ज्वेलरीला अलिकडच्या काळात खूपच लोकप्रियता मिळाली आहे. अतिशय वेगळे आणि सुंदर दिसणारे हे दागिने तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. आजच्या आधुनिक युगात मुलींना पारंपारिक दागिन्यांसोबत त्यात एक वेगया प्रकारचा ट्रेंडीनेस समाविष्ट करायला आवडतो. अशा परिस्थितीत ऑक्सिडाइज्ड दागिने हा एक चांगला पर्याय ठरतो. (Oxidised Jewellery Set)

ऑक्सिडाइज्ड दागिने हे ऍंटिक दिसावेत म्हणून डार्कनिंग मेटल्सद्वारे बनवले जातात. या प्रक्रियेमध्ये धातूला काही रसायने किंवा पर्यावरणीय परिस्थितींशी एक्सप्लोअर केले जाते, ज्यामुळे धातू काळसर पडतो. (Oxidised Jewellery Set)

(हेही वाचा – महाराष्ट्र हे भटक्या आत्म्याचे शिकार झालेले राज्य ; PM Narendra Modi यांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका)

ऑक्सिडाइज्ड दागिने बनवण्या सोने (Gold) आणि तांब्याचाही (Copper) वापर केला जाऊ शकतो. मात्र चांदीचा वापर अधिक केला जातो. ऑक्सिडाइज्ड दागिने गडद रंगांचे असतात, म्हणून ट्रेंडी आणि पारंपारिक पोशाखांवरही ते उठून दिसतात. हे दागिने इतके क्लिष्ट असतात की याची कारागिरी पाहून आपण प्रेमातच पडतो. (Oxidised Jewellery Set)

तुम्ही Myntra वर विविध प्रकारचे ऑक्सिडाइज्ड नेकलेस, कानातले, बांगड्या शोधू शकता. उत्सव फॅशनमध्येही ऑक्सिडाइज्ड कानातले आणि नेकलेस मिळू शकतात. विशेषतः कुशल्स ब्रँड (Kushals Brand) ऑक्सिडाइज्ड चांदीच्या दागिने बनवण्यामध्ये माहिर आहे. प्रियासी ज्वेलरीमध्ये ऑक्सिडाइज्ड कानातले आणि ब्रेसलेट चांगल्या प्रकारे बनवले जातात. रुबन्स येथे ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर, कुंदन, मोत्यांचे अद्भुत दागिने तुम्ही खरेदी करु शकता. (Oxidised Jewellery Set)

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.