AC Government Of India : गडचिरोलीत एसी सरकारचा उन्माद; मतदान घेणे सरकारसमोर आव्हान; कुणाची आहे ही संघटना?

छत्तीसगडचे ५, तेलंगणाचे ३ आणि महाराष्ट्राचे ३ अशा ११ जिल्ह्यांची सीमा असलेल्या गडचिरोलीत भाकप माओवादी अर्थात नक्षलवाद्यांचा मतदानास विरोध राहिला आहे.

148
राज्यातील सर्वात संवेदनशील मतदारसंघ असलेल्या गडचिरोलीमध्ये १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे, मात्र इथे मतदान घेणे सरकारसाठी आव्हान बनले आहे. याला कारण आहे एसी सरकार (AC Government Of India), ज्यांनी स्वतःला समांतर सरकार म्हणून जाहीर केले आहे. ही संघटना नक्षलवाद्यांच्या नवे स्वरूप मानले जात आहे. या संघटनेचा सध्या सुरु असलेल्या निवडणुकांवर विश्वास नाही.
गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील माओवाद्यांचे नेटवर्क कमजोर झाले असले तरी या मतदानाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड सीमेवरून नक्षलींचा प्रवेश होत घातपाताची शक्यता पोलिस दलाला वाटत आहे. दरम्यान, नाशिक – डांगच्या सीमेवर प्रभावी असलेल्या एसी भारत सरकार  (AC Government Of India) या शासन न मानणाऱ्या समूहाचा जिल्ह्यात शिरकाव झाला आहे. एटापल्ली गावातील पिपली बुर्गों गावात याविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगडचे ५, तेलंगणाचे ३ आणि महाराष्ट्राचे ३ अशा ११ जिल्ह्यांची सीमा असलेल्या गडचिरोलीत भाकप माओवादी अर्थात नक्षलवाद्यांचा मतदानास विरोध राहिला आहे. यंदा प्रथमच येथील एकाही गावात निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे नक्षलवाद्यांचे पत्रक किंवा बॅनर झळकलेले नाही.
परिघातील नक्षलींच्या हालचाली टिपणाऱ्या स्विथ ड्रोनमुळे येथील पोलिस यंत्रणेस नक्षलींच्या हालचाली टिपणे शक्य होत आहे. मात्र, एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी पोलिस ठाण्यात आणि सहकाऱ्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम ५०५ (१) (व) आणि कलम १३५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आम्हीच भारत सरकार  (AC Government Of India) म्हणजे या भूमीचे मालक असून देशातील भारत सरकारला मानत नसल्याचा प्रचार हा गट करत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. स्थानिक खाणीच्या विरोधात लोकांना सरकारविरोधात भडकवत असल्याचा व मतदानाच्या प्रक्रियेत बाधा आणत असल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे एसी भारत सरकार?

गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांमधील नक्षलींचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र, आता येथील आदिवासी तरुणांमध्ये मूल आदिवासी म्हणून अस्मितावादी चळवळ जोर धरत आहे. हाच विचार मांडणा-या एसी भारत  (AC Government Of India) राजस्थानातील सीमेवरील पहाडों गावामधील आदिवासी एसी भारत सरकार समूहाचे सदस्य आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.